Finance New Rules : देशात 1 ऑक्टोबरपासून अनेक नियमांमध्ये बदल होणार आहे. ज्यामध्ये क्रेडिट, डेबिट कार्ड, पोस्ट ऑफिस योजना, बँकांशी संबंधित नियमांचा समावेश आहे. माहितीनुसार, या बदलांमध्ये PNB चे नवीनतम बचत खाते शुल्क, ICICI बँकेचे डेबिट कार्ड शुल्क, HDFC बँकेचे क्रेडिट कार्ड नियम, लहान बचत योजनांचे नियमांचा समावेश आहे.
PNB नवीनतम शुल्क
पंजाब नॅशनल बँकने बचत खात्यांसाठी लागू असलेल्या काही चालू क्रेडिट-संबंधित सर्विस खर्चांमध्ये बदल जाहीर केले आहे. यामध्ये सरासरी शिल्लक राखणे, डिमांड ड्राफ्ट जारी करणे, डीडी डुप्लिकेट करणे, चेक (ईसीएससह), पैसे काढणे खर्च आणि लॉकर शुल्क यांचा समावेश आहे. नवीन शुल्क 1 ऑक्टोबर 2024 पासून लागू होईल.
HDFC बँक क्रेडिट कार्ड नियमांमध्ये बदल
HDFC बँकेने दिलेल्या माहितीनुसार, ऍपल प्रॉडक्टसाठी SmartBuy प्लॅटफॉर्मवर प्रति कॅलेंडर तिमाहीत एका प्रॉडक्टपर्यंत रिवॉर्ड पॉइंट्स मर्यादित केले आहे. तसेच 1 ऑक्टोबरपासून SmartBuy पोर्टल तनिष्क व्हाउचरसाठी रिवॉर्ड पॉइंट्सची पूर्तता प्रति कॅलेंडर तिमाहीत 50,000 रिवॉर्ड पॉइंट्सपर्यंत मर्यादित करण्यात येणार आहे. माहितीनुसार, हे बदल फक्त Infinia आणि Infinia Metal कार्डांवर लागू होणार आहे.
ICICI बँक डेबिट कार्ड शुल्क
1 ऑक्टोबरपासून तुम्ही मागील कॅलेंडर तिमाहीत 10,000 रुपये खर्च करून दोन फ्री कॉम्प्लीमेंट्री एयरपोर्ट लाउंज एक्सेसचा आनंद घेऊ शकतात अशी माहिती ICICI बँकेकडून देण्यात आली आहे. मागील कॅलेंडर तिमाहीत खर्च केल्यास पुढील कॅलेंडर तिमाहीसाठी एक्सेस अनलॉक होईल. ऑक्टोबर-नोव्हेंबर-डिसेंबर 2024 तिमाहीत मोफत लाउंज एक्सेससाठी पात्र होण्यासाठी, तुम्हाला जुलै-ऑगस्ट-सप्टेंबर 2024 या तिमाहीत किमान 10,000 रुपये खर्च करावे लागतील आणि पुढील तिमाहीसाठी देखील तुम्हाला 10,000 रुपये खर्च करावे लागतील.
लोकसभेत तुतारी आणि पिपाणीमुळे गोंधळ, विधानसभेसाठी काय निर्णय घेणार? आयुक्तांनी स्पष्टच सांगितले
बचत योजना नियम
पोस्ट ऑफिसमधील पीपीएफ आणि सुकन्या समृद्धी योजनेमधील खाती 1 ऑक्टोबर पासून नवीन समायोजनांच्या अधीन असणार आहे. याच बरोबर नॅशनल स्मॉल सेव्हिंग्ज (NSS) योजनांतर्गत उघडण्यात आलेली अनियंत्रित खाती देखील 1 ऑक्टोबरपासून प्रभावित होणार आहे.