ChatGPT Advice Wrong Tips Shocking Experience : तज्ज्ञांनी इशारा दिला होता की सध्या एआयकडून उपचार किंवा वैद्यकीय सल्ला घेणे सुरक्षित नाही, कारण ते अद्याप डॉक्टरांची जागा घेण्याइतके विकसित झालेले नाही. भविष्यात एआय (AI) डॉक्टरांची जागा घेईल तरी, आता त्यावर अवलंबून राहणे धोकादायक ठरू शकते. या इशाऱ्याचे उदाहरण म्हणजे न्यू यॉर्कमधील एका 60 वर्षीय व्यक्तीचे प्रकरण, ज्याला चॅटजीपीटीने (ChatGPT Advice) दिलेल्या चुकीच्या सल्ल्यामुळे तीन आठवडे रुग्णालयात राहावे लागले. सध्या तो उपचारानंतर घरी परतला आहे.
दारू-कोंबडीमुळे कितीजण मेले? जैन मुनींचा चित्रा वाघ-मनीषा कायंदेंना टोला, कबुतरांवरून वाद पेटला…
नेमकं काय घडलं?
टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, त्या माणसाने चॅटजीपीटीला (Shocking Experience) विचारले की त्याच्या जेवणातून मीठ (सोडियम क्लोराईड) कसे काढायचे. एआयने मीठाऐवजी सोडियम ब्रोमाइड वापरण्याचा सल्ला दिला. 20 व्या शतकाच्या सुरुवातीला काही औषधांमध्ये याचा वापर केला जात होता, परंतु आता तो मोठ्या प्रमाणात विषारी मानला जातो. या सल्ल्यावर विश्वास ठेवून, त्या माणसाने ऑनलाइन सोडियम ब्रोमाइड (Shocking News) विकत घेतले. तीन महिने मीठाऐवजी ते जेवणात वापरले. या काळात, त्याने कोणत्याही डॉक्टरांचा सल्ला घेतला नाही, ज्यामुळे त्याच्या आरोग्याचे मोठे नुकसान झाले.
गंभीर लक्षणे आणि भीती
सोडियम ब्रोमाइड खाल्ल्यानंतर, त्या माणसाला तीव्र भीती, भ्रम, जास्त तहान आणि मानसिक गोंधळ अशा अनेक गंभीर समस्या येऊ लागल्या. त्याची प्रकृती इतकी बिकट झाली की, जेव्हा त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेव्हा त्याने पाणीही पिण्यास नकार दिला. कारण त्याला वाटले की, पाण्यात काहीतरी मिसळले आहे. तपासणीत असे दिसून आले की, तो ब्रोमाइड विषारीपणाचा बळी झाला होता.
डॉक्टरांनी वाचवले प्राण
रुग्णालयात डॉक्टरांनी त्याच्या शरीरातील पाणी आणि इलेक्ट्रोलाइट संतुलन पुनर्संचयित केले. सुमारे तीन आठवड्यांच्या उपचारानंतर, त्याचे सोडियम आणि क्लोराइड पातळी सामान्य झाली आणि त्याला डिस्चार्ज देण्यात आला.
एआय वैद्यकीय सल्ल्यावर अवलंबून राहू नका
जर्नल ऑफ द अमेरिकन कॉलेज ऑफ फिजिशियन्समध्ये प्रकाशित झालेल्या या प्रकरणात हे स्पष्ट झालंय की, तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय आरोग्य आणि पोषणाशी संबंधित बाबींमध्ये एआयचे अनुसरण करणे धोकादायक ठरू शकते. विशेषतः जेव्हा मीठ किंवा इतर आवश्यक पोषक तत्वांचा विचार केला जातो, तेव्हा एआयऐवजी वैद्यकीय व्यावसायिकांचा सल्ला घ्या.