Download App

‘आता चित्त्यांना आवरा, आणखी आणू नका नाहीतर’.. मोदी सरकारला धोक्याचा इशारा

Kuno National Park : मोदी सरकारने मोठा गाजावाजा करत दक्षिण आफ्रिका, नामिबिया या देशांतून थेट भारतात चित्ते आणले. भारतात नामशेष झालेला चित्ता पुन्हा दिसेल असा हेतू त्यामागे होता. मात्र भारतातील हवामान या चित्त्याने काही मानवले नाही. काही चित्त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर आता नामिबियातील चित्ता संवर्धन समितीने दिलेल्या इशाऱ्याने सरकारचे टेन्शन वाढणार आहे.

कुनो राष्ट्रीय उद्यानाच्या (Kuno National Park) जंगलात आणखी चित्ते सोडल्यास आव्हानात्मक परिस्थिती निर्माण होईल असा इशारा नामिबियातील चित्ता संवर्धन समिती (चिता कन्जर्वेशन फंड) या संस्थेने दिला आहे. या संस्थेने नामिबियातून भारतात चित्त्यांचे स्थलांतर करण्याच्या कामात सहकार्य केले.

आफ्रिकेतील चित्त्यांचे भारतात मरण; तिसऱ्या चित्त्यानेही सोडला प्राण

अलीकडच्या काळात भारतात आणलेल्या चित्त्यांपैकी काही चित्त्यांचा मृत्यू झाला आहे. तापमानातील चित्त्यांना सहन होत नसल्याचे सांगण्यत येत आहे. त्यांच्या संरक्षणासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यातच आता संस्थेने येथे आणखी चित्ते आणू नये अन्यथा परिस्थिती आव्हानात्मक होईल असे म्हटले आहे.

भारतात चित्ते पाठवण्याआधी जी अपेक्षा व्यक्त केली होती त्यापेक्षा चांगले काम होत आहे. प्रकल्प योग्य दिशेने जात आहे. मात्र त्याच वेळी उर्वरित चित्त्यांनाही कुनोच्याच जंगलात सोडले तर आणखी आव्हाने निर्माण होण्याची शक्यता संस्थेने व्यक्त केली आहे.

भारतातील वातावरणात टिकून राहण्याचे कौशल्य चित्त्यांनी आत्मसात केले आहे. मात्र, अजून मोठा पल्ला गाठणे बाकी आहे. अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागेल, असा इशारा या संस्थेने दिला आहे.

अशी अवस्था असेल तर चित्ते राहणार कसे ?

कुनो अभयारण्याची क्षमता दहा ते बारा चित्ते राहू शकतील इतकीच आहे. जास्तीत जास्त पंधरा चित्ते तेथे राहू शकतात.

येथे चित्त्यांसाठी पाहिजे त्या प्रमाणात भक्ष्य नाहीत. त्यामुळे चित्त्यांची उपासमार होण्याची शक्यता आहे.

कुनोमध्ये आतापर्यंत वीस चित्त्यांना स्थलांतरित करण्यात आले आहे. आणखी चित्ते सोडल्यास मानव-चित्ता संघर्ष उद्भवण्याचीही भीती व्यक्त करण्यात आली आहे. तसा अनुभव येण्यास सुरुवात झाली आहे.

१९५२ मध्येच भारताने चित्ता गमावला

१९५२ मध्ये भारतातून चित्ता नामशेष झाल्याचे घोषित करण्यात आले. मध्य प्रदेशाच्या जंगलात सोडण्यात आले असलेले हे चित्ते नामिबियातील आहेत. त्यांना या नवीन वर्षांच्या सुरुवातीला स्वाक्षरी केलेल्या सामंजस्य कराराखाली आणण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुनो नॅशनल पार्कमध्ये ८ चित्ते सोडले होते. मोदी सरकारने १७ सप्टेंबर २०२२ या दिवशी म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी देशात ८ चित्ते आणण्यात आले होते. या चित्त्यांची चर्चा देशभर चांगलीच झाली.

नामिबियातून हे चित्ते मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय अभयारण्यात आणण्यात आले. १९४७ नंतर पहिल्यांदा भारतात चित्ते बघितले गेले. त्याअगोदर सुरजगुजाच्या राजाने जे आता छत्तीसगढमध्ये आहे, ३ चित्ते शिकारीत मारले होते. मात्र आता जे चित्ते आणले गेले आहेत, आता त्यानंतर १२ चित्त्यांची भर त्यामध्ये टाकण्यात आली.

Tags

follow us