Chief Minister of Karnataka : काँग्रेसने कर्नाटकात एकहाती सत्ता मिळवल्यानंतर मुख्यमंत्रिपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार? याकडं संपूर्ण देशाचं लक्ष लागलं होतं. कारण भाजपसाठी प्रतिष्ठेची मानली जाणाऱ्या या निवडणुकीत काँग्रेसने भाजपचा धुव्वा उडवलाय. 135 जागांवर विजय मिळवत कर्नाटकात काँग्रेसचं अस्तित्व दाखवून दिलंय.
कर्नाटकाच्या मुख्यमंत्रिपदासाठी सिद्धरामय्या (Siddaramaiah) यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलंय, मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष डी.के. शिवकुमार (D.K.Shivkumar) यांना त्यांनी मागं टाकलं आहे. काँग्रेसने सिद्धरामय्या यांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ का टाकलीय? तसेच सिद्धरामय्या यांनी डीके शिवकुमार यांना कसं मागे टाकलं? याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना काय आहे? वाचा!
मुख्यमंत्रिपदासाठी काँग्रेसच्या हायकमांडने सिद्धरामय्या यांच्या नावावर शिक्कामोर्तब का केले? याची पाच कारणे आहेत.
सिद्धरामय्यांकडे आमदारांचं बहुमत :
निवडणुकीत मिळालेल्या घवघवीत यशानंतर 135 आमदारांपैकी 95 आमदारांनी सिद्धरामय्या यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं होतं. त्यामुळे सिद्धरामय्या यांच्याकडेच आमदारांचं बहुमत असल्याचं सिद्ध झालं होतं. जर सिद्धरामय्यांऐवजी डी.के. शिवकुमार यांना मुख्यमंत्री केलं असतं तर सिद्धरामय्या बंडखोरी करतील अशी शक्यता वर्तवण्यात आली होती.
Anushka Sharma : बाईकवर हेल्मेट न घालणं महागात; 4 आकडी रक्कमेत भरावा लागला दंड
डी.के. शिवकुमार यांच्यावर अनेक गुन्हे :
डी.के. शिवकुमार यांच्यावर अनेक गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. अशातच कर्नाटकचे पोलिस महासंचालक प्रविण सूद यांची सीबीआयच्या संचालकपदी नियुक्ती झालीय. प्रविण सूद हे डी.के. शिवकुमार यांना जवळून ओळखत असल्याची माहिती समोर आलीय. दोघांमध्ये मतभेद असल्याचीही माहिती आहे. त्यामुळे डी.के. शिवकुमार यांना मुख्यमंत्री केलं तर सीबीआयकडून त्यांच्या जुन्या फाईल्स उघडकीस आल्या असत्या, त्याचं नूकसान सरकारला झालं असतं, असं काँग्रेसला वाटत होतं.
वंचित घटकावर सिद्धरामय्यांची मजबूत पकड :
सिद्धरामय्यांची कर्नाटकातल्या दलित, ओबीसी, मुस्लिम घटकामध्ये मजबूत पकड आहे. या घटकांमध्ये ते लोकप्रिय नेते आहेत. त्यामुळेच सिद्धरामय्यांना मुख्यमंत्री केलं नसतं तर राज्यातील दलित, अल्पसंख्यांकाची मते काँग्रेसमधून फुटली असती, अशी शक्यता वर्तवण्यात आली होती.
शिवराज्याभिषेक दिन अन् वर्धापन दिन एकाच दिवशी; 10 जूनला राष्ट्रवादीचे भव्य शक्ती प्रदर्शन
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महत्वाचं पाऊल :
कर्नाटकात लोकसभेच्या एकूण 28 जागा आहेत. त्यापैकी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला फक्त एकच जागा मिळाली होती. लोकसभा निवडणुकी स्वत: मल्लिकार्जून खर्गे हेदेखील गुलबर्गामधून निवडणूक हरले होते. त्यांनतर आता राज्यात काँग्रेसचे सरकार स्थापन झालंय, त्यामुळे लोकसभेच्या अधिक जागांवर विजय मिळवण्याचा उद्देश ठेऊन हायकंमाडने सिद्धरामय्या यांची निवड केलीय.
सिद्धरामय्या यांचा ‘अहिंदा’ फॉर्म्युला :
मागील अनेक वर्षांपासून सिद्धरामय्या हे अल्पसंख्यांक, मागासवर्गीय आणि दलित वर्ग या समीकरणावर काम करीत होते. अहिंदा समीकरणात त्यांचं लक्ष राज्यातील 61 टक्के लोकसंख्येवर होतं. या फॉर्मुल्यामध्ये अल्पसंख्यांक, दलित, मागासवर्गीय मतदारांना एकत्र आणता येईल. कर्नाटकात 39 टक्के दलित, आदिवासी आणि मुस्लिम मतदान आहे. त्यात सिद्धरामय्या यांच्या कुरबा समाजही 7 टक्के आहे.
दरम्यान, निवडणुकीपूर्वीच सिद्धरामय्या यांनी ही आपली शेवटची निवडणूक असल्याचे जाहीर केलं होतं. निवडणुकीनंतरही त्यांनी हायकमांडसमोर हाच डाव खेळला. यानंतर आपण कोणतेही पद घेणार नसल्याचे त्यांनी सांगितले. अशा स्थितीत त्यांना शेवटची संधी द्यायला हवी, हाच विचार करुन काँग्रेसने सिद्धरामय्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं आहे.