डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना काय आहे? वाचा!

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना काय आहे? वाचा!

LetsUpp | Govt.Schemes
स्वाधार योजना (Swadhar Yojana)ही जे विद्यार्थी अनुसूचित जाती (Scheduled caste)व नवबौद्ध घटकामध्ये (Neo-Buddhist elements)मोडतात. अशा विद्यार्थ्यांना शिक्षण (Education)घेता यावे, यासाठी या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र शासनाच्या (Government of Maharashtra)सामाजिक न्याय (Social justice)व विशेष सहाय्य विभागाकडून स्कॉलरशिप ही देण्यात येत असते. या स्वाधार योजनेमध्ये लाभ मिळविण्यासाठी ज्या विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळाला नाही. अशा विद्यार्थ्यांना जेवण, राहण्याची सोय व शैक्षणिक सुविधा विद्यार्थ्यांना मिळाल्या पाहिजेत म्हणून या स्वाधार योजनेअंतर्गत अशा विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात काही रक्कम वितरित करण्यात येत असते.

11th Admission ऑनलाईन प्रक्रिया कधी सुरू होणार? जाणून घ्या सविस्तर वेळापत्रक

‘या’ योजनेअंतर्गत स्कॉलरशिप किती मिळते? : जे विद्यार्थी मुंबई शहर, नवी मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर या ठिकाणी शिकतात. अशा विद्यार्थ्यांना भोजन भत्ता 32,000 रुपये तसेच निवास भत्ता हा 20,000, निर्वाह भत्ता 8000 रुपये असे मिळून एकूण वार्षिक अनुदान हे 60,000 रुपये देण्यात येते.

शहरात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी किती भत्ता मिळतो?
● भोजन भत्ता हा 28,000
● निवास भत्ता हा 15,000
● निर्वाह भत्ता हा 8,000
● असे मिळून वार्षिक अनुदान 51,000 मिळते.

मनपा शहरात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी किती भत्ता मिळतो?
● भोजन भत्ता हा 25,000
● निवास भत्ता हा 12,000
● निर्वाह भत्ता हा 6,000
● असे मिळून एकूण वार्षिक अनुदान हे 43,000 मिळते.

स्वाधार योजनेसाठी पात्रता काय आहे? :
● अर्ज करणारा विद्यार्थी हा सर्वप्रथम आपल्या महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
● स्वाधार योजनेसाठी अर्ज करणारा विध्यार्थी हा अनुसूचित जाती व नवबौध्द या घटकातील असावा.
● स्वाधार योजनेअंतर्गत अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्याला शासकीय किंवा समाजकल्याण वसतिगृहात प्रवेश मिळालेला नसावा.
● स्वाधार योजने अंतर्गत लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्याने ज्या कोर्सच्या अंतर्गत वसतिगृहात प्रवेश मिळतो अशा कोर्समध्ये प्रवेश घेतलेला असावा.
● स्वाधार योजने अंतर्गत स्कॉलरशिप मिळविण्यासाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यास दहावी, बारावी, पदवी, पदविकामध्ये कमीत कमी 50 टक्के पेक्षा जास्त गुण असणे आवश्यक आहे.
● तसेच या योजनेमध्ये दिव्यांग (अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील) विद्यार्थ्यांसाठी 3 टक्के इतके आरक्षण हे आरक्षित ठेवण्यात आले आहे. अशा विद्यार्थ्यांना कमीत कमी 40 टक्के इतके गुण असावे.
● वडिलांचे उत्पन्न हे 2.50 लाख रुपये पेक्षा जास्त नसावे.
● महाविद्यालयामधून 75 टक्के उपस्थिती प्रमाण पत्र जोडावे.

स्वाधार योजनेसाठी अर्ज कसा करायचा? :
● ज्या विद्यार्थ्यांना swadhar yojana साठी अर्ज करायचा असेल त्यांनी या
http://sjsa.maharashtra.gov.in किंव्हा http://maharashtra.gov.in या संकेतस्थळवर अर्जाचा नमूना हा उपलब्ध करून दिलेला आहे.
● तसेच या वेबसाईट वर कागदपत्रांची यादी, अटी व पात्रता या विषयी संपूर्ण माहिती दिलेली आहे. सदर स्वाधार योजनेचा अर्ज डाऊनलोड करून सर्व आवश्यक कागदपत्रे जोडून सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण येथे सादर करावा लागेल.
● वरील सर्व पात्रता तुमच्याकडे असेल तर तुम्ही या swadhar yojna अंतर्गत स्कॉलरशिप मिळवू शकतात. आणि अर्ज केल्या नंतर मेरिट लिस्ट प्रमाणे विद्यार्थ्यांची निवड करण्यात येत असते.

टीप : वरील योजनेच्या नियमात किंवा आणखी काही बाबींमध्ये बदल असू शकतात. वाचकांच्या माहितीकरिता सदर माहिती संकलित करण्यात आली आहे. तरी काही त्रुटी वाटल्यास वाचकांनी पुनश्च एकवार खात्री करून घ्यावी.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube