India China : भारत सरकारने ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) राबवून पाकिस्तानला चांगलाच धडा शिकवला आहे. आता नंबर चीनचा (India China) आहे. चीनला धडा शिकवण्याची तयारी मोदी सरकारने केली आहे. चीनने पहलगाम हल्ल्यानंतर (Pahalgam Attack) सातत्याने पाकिस्तानचे समर्थन केले होते. त्यामुळे आता भारत सरकारने चीनचा बंदोबस्त करण्याता प्लॅन तयार केला आहे. दुसरीकडे चीनही भारताची कोंडी करण्याचा पूरेपूर प्रयत्न करत आहे.
इलेक्ट्रॉनिक वस्तूंमधील काही खास कॅटेगरीच्या वस्तूंवर BIS (Bureau of Indian Standards) मार्क असणे आवश्यक करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. चीनकडून रिक्लायनर, फर्निचर, व्हर्लपूल बाथ, स्पा, इलेक्ट्रॉनिक टॉयलेट, कपडे वाळवण्याचे मशीन यांसारख्या वस्तू पण त्या खराब दर्जाच्या पुरवठा केल्या जात होत्या. चीनची ही कुरापत भारताच्या लक्षात आली त्यानंतरच सरकारने हा निर्णय घेतला आहे.
सिंधू नदीचा पाणी प्रश्न चिघळला, आंदोलनाला हिंसक वळण, गृहमंत्र्यांचं घर पेटवलं
इकॉनॉनिक टाइम्सच्या रिपोर्टनुसार चीनमधून आयात होणाऱ्या बीआयएस स्टँडर्डच्या वस्तूंवर हा नियम सक्तीने लागू केला जाणार आहे. चीनमधून येणारे काही इलेक्ट्रॉनिक सामान अत्यंत खराब दर्जाचे येत आहे अशा तक्रारी अनेक दिवसांपासून येत होत्या. या तक्रारींची आता दखल घेण्यात आली आहे. उद्योग आणि आंतरिक व्यापार संवर्धन विभागाने (DPIIT) 19 मे रोजी एक आदेश जारी केला आहे. DPIIT वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या अखत्यारित आहे. सरकारचा हा आदेश लगेच लागू होणार नाही. तर पुढील वर्षात म्हणजेच 19 मार्च 2026 पासून लागू होणार आहे.
चीनी वस्तूंवर बीआयएस मार्कच्या निर्णयाचे देशातील उद्योग जगताने स्वागत केले आहे. हा एक क्वॉलिटी कंट्रोल आदेश आहे. सरकारने या वस्तू भारतातच तयार कराव्यात अशा सूचना येथील उद्योगांना दिल्या आहेत. सध्या लहान उपकरणे मोठ्या प्रमाणात आयात केली जातात. या वस्तू भारतातच तयार व्हाव्यात यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत.
चीनमधून येणाऱ्या खराब दर्जाच्या वस्तूंना भारतात बंदी घालण्याची मागणी सातत्याने केली जात होती. आता सरकारने हा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे येथील स्थानिक व्यापाऱ्यांना याचा फायदा होणार आहे. भारतात इलेक्ट्रिक शेवर, हेयर क्लिपर, इलेक्ट्रिक फ्राइंग पॅन, स्टीम कुकर, किटनाशक, कॉफी मेकर, इलेक्ट्रिक कॅन ओपनर, इलेक्ट्रिक सिट्रस फ्रुट स्क्विजर, एग बीटर, आउटडोर बारबेक्यू, बॅटरीवर चालणारे मसाजर, फूट वार्मर, हीटिंग पॅड, टूथब्रश यासांरख्या वस्तूंच्या उत्पादनात वेग येईल.
सिंधू करार स्थगित होताच पाकिस्तानच्या मदतीला चीन; पाणी अन् विजेसाठी चीनचा प्रोजेक्ट सुरू..