Telangan Election Result : तेलंगणा राज्यात बीआरएसचे प्रमुख आणि मुख्यमंत्री केसीआर(KCR) यांना मोठा बसणार असल्याची शक्यता आहे. कारण काँग्रेसचे उमेदवार रेवंत रेड्डी(Revant Reddy) यांनी कामारेड्डी मतदारसंघातून 2 हजार मतांनी आघाडीवर आहेत. तर केसीआर तिसऱ्या क्रमांकावर आहेत. रेवंत रेड्डी यांना 38 हजार 425 तर भाजपचे काटेपल्ली व्यंकटरामण रेड्डी यांना 38 हजार 159 मते मिळाली आहेत. तसेच मुख्यमंत्री केसीआर तिसऱ्या क्रमांकावर असून ते 36 हजार 665 मतांनी पिछाडीवर आहेत. तेलंगणामध्ये(Telangan Election Result) मुख्यमंत्री केसीआर यांचं अधिकचं वरदहस्त असून रेवंत रेड्डींनी केसीआर यांना पिछाडीवर सोडल्याने हा केसीआर यांना मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे. अद्याप मतमोजणी सुरु असून निवडणूक आयोगाकडून अधिकृतपणे निकाल देण्यात आलेला नाही.
‘दादांच्या वक्तव्याचा आम्ही आदर करतो, पण…’; शंभुराजे देसाईंचा सातारा लोकसभेबाबत सुचक विधान
तेलंगणामध्ये केसीआर आणि रेवंत रेड्डी यांच्यात चांगलीच चुरस असल्याचं पाहायला मिळालं आहे. निवडणुकीच्या प्रचारादरम्यानही दोन्ही नेत्यांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फेऱ्या सुरु असल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यामुळे संपूर्ण राज्याचं या दोन नेत्यांच्या निवडणूक लागलं आहे. केसीआर दोन मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत. एक कामारेड्डी आणि दुसरा त्यांचा बालेकिल्ला गजवेलमधून. कामारेड्डी मतदारसंघात केसीआर पिछाडीवर असले मात्र, गजवेल मतदारसंघातून ते आघाडीवर आहेत.
Vidya Chavan : चिंतन शिबिरातून अजितदादांची अस्वस्थता दिसली; विद्या चव्हाणांचा अजितदादांवरच हल्लाबोल
तेलंगाणा राज्य निर्मितीपासून सत्ता काबीज केलेल्या केसीआर यांच्या बीआरएसला (BRS) धक्का देण्याची तयारी काँग्रेसने केली आहे. सध्याच्या कलात काँग्रेस (Congress) आघाडीवर दिसत आहे. एक्झिट पोलमधील निष्कर्षानुसार राज्यात काँग्रेसची सत्ता येईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या निवडणुकीत स्वतः मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव, काँग्रेसचे दिग्गज नेते रेवंथ रेड्डी, एमआयएमचे असदुद्दीन ओवैसी आणि भाजपाचे राजा या उमेदवारांच्या भवितव्याकडे लक्ष लागले आहे. सिद्धपेट जिल्ह्यातील गजवेल ही जागा अतिशय महत्वाची आहे. मुख्यमंत्री केसीआर येथे निवडणूक लढत आहेत. भाजपने आमदार एटेला राजेंद्र यांनी तिकीट दिलं आहे. तर काँग्रेसने टीएन रेड्डी यांना तिकीट दिलं आहे. 2018 च्या निवडणुकीत सीएम राव यांनी ही जागा जिंकली होती.
काँग्रेसचे उमेदवार आणि माजी क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दीन हे हैदराबादच्या जुबली हिल्समधून पिछाडीवर आहेत. गोसमहलमधून भाजपचा हिंदू चेहरा टी राजा सिंह ४ हजार मतांनी आघाडीवर आहेत. AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांचे भाऊ अकबरुद्दीन ओवेसी हे चंद्रयांगुट्टा मतदारसंघातून आघाडीवर आहेत.
सकाळी 11 वाजेपर्यंतच्या निकालाच्या माहितीनूसार तेलंगणामध्ये काँग्रेस 67 जागांवर आघाडीवर असून बीआरएस 38 तर भाजप 8 आणि इतर 1 अशी परिस्थिती आहे. एकूणच पाहता तेलंगणात काँग्रेसकडून बीआरएसचा धुव्वा उडवणार असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे तेलंगणा राज्यात काँग्रेसच सत्ता स्थापन करणार असल्याचं पाहायला मिळत आहे.