‘दादांच्या वक्तव्याचा आम्ही आदर करतो, पण…’; शंभुराजे देसाईंचा सातारा लोकसभेबाबत सुचक विधान

  • Written By: Published:
‘दादांच्या वक्तव्याचा आम्ही आदर करतो, पण…’; शंभुराजे देसाईंचा सातारा लोकसभेबाबत सुचक विधान

Shambhuraj Desai on Ajit Pawar : देशात आगामी काळात लोकसभा निवडणुका (Lok Sabha elections) होत आहेत. त्यासाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारी केली आहे. भाजपने लोकसभेच्या ४५ हून अधिक जागा राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या सहकार्याने निवडणूक लढवण्याचा निर्णय केला. जागावाटपाचा फॉर्म्युलाही ठरला असल्याची चर्चा आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी काल कर्जत येथील कार्यकर्त्यांच्या शिबिरात बोलताना बारामती, शिरूर, सातारा, रायगड या जागा आपण लढणार असल्याचं वक्तव्य केलं. त्यावर आता शिंदे गटाचे उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Assembly election Results 2023: लोकसभेची सेमीफायनल कोण जिंकणार? प्रत्येक अपडेट पाहा लेट्सअपवर !

शनिवारी शंभूराजे देसाई हे कोल्हापूर दौऱ्यावर आले. यावेळी त्यांनी करवीर निवासिनी अंबाबाई देवीचं दर्शन घेत आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीसंदर्भात सूचक वक्तव्य केलं. ते म्हणाले, अजित पवार गट नुकताच महायुतीत सहभागी झाला. ज्या मतदार संघात, ज्या पक्षाचा खासदार आहे, तिथून त्याचं पक्षाने लोकसभा लढवावी, असं जरी ठरलं तरी साताऱ्याचे विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील हे शरद पवारांच्या गटात आहेत. ते अजित दादांच्या गटात नाही, असं देसाई म्हणाले.

ते म्हणाले, आम्ही दादांच्या वक्तव्याचा आदरच करतो. मात्र साताऱ्याच्या जागेबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे तिन्ही नेते एकत्र बसून निर्णय घेतील, असं देसाईंनी सांगितलं.

भाजपच्या राशीला भूपेश बघेलांची टक्कर, जाणून घ्या काय म्हणते ग्रहांची चाल 

यावेळी त्यांनी आरक्षणावरही भाष्य केले. ते म्हणाले, आम्ही अधिवेशनात मराठा समाजासह धनगर आणि इतर आरक्षणांवर सकारात्मक चर्चा करू. कोणाचं तरी काढून कोणाला तरी दिलं जाईल, असा एक गैरसमज सध्या पसरवल्या जात आहेत. मात्र, कोणाचेही काढून न घेता आणि कायदेशीर दृष्ट्या टिकणारं आरक्षण हे सरकार देणार असल्याचं देसाईंनी सांगितलं. ते पुढे म्हणाले की, दगडफेक, जाळपोळ, पोलिसांवर हल्ला अशा प्रकरणांमध्ये वेगवेगळ्या नियमांनुसार कारवाई केली जाईल. सरकार जाणीवपूर्वक कोणतीही कडक कारवाई करण्याच्या मनस्थितीत नाही. मुख्यमंत्री शिंदे यांच्या शब्दावर आपला विश्वास असल्याचे त्यांनी म्हटले. यावेळी त्यांनी जरागेंनी संयम बाळगावा, असंही सांगितलं.

आज दुपारी राजेश टोपे यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला. याविषयी विचारलं असता देसाई म्हणाले की, टोपे यांच्या गाडीवर हल्ला झाल्याची आपल्याला माहिती नाही, असं सांगत बोलणं टाळलं.

अजित पवार यांनी सातारा लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक लढणार असल्याचे काल जाहीर केल्यानंतर अजितदादा पवार गटाचा उमेदवार कोण? याकडे सगळ्यांच्या नजरा खिळल्या आहेत. अशातच आता शंभुराजे देसाईंनी या जागेबाबत सुचक वक्तव्य केलं. त्यावर आता अजितदादाकडून काय प्रत्युत्तर दिल जातं, हेच पाहणं महत्वाचं आहे.

अजित पवारांनी सातारा लोकसभा लढणार असल्याचं जाहीर केल्यानंतर आता शंभुराजे देसाईंनी या जागेबाबत सुचक वक्तव्य केलं. त्यावर आता अजितदादा काय प्रत्युत्तर देतात हेच पाहणं महत्वाचं आहे.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube