Vidya Chavan : चिंतन शिबिरातून अजितदादांची अस्वस्थता दिसली; विद्या चव्हाणांचा अजितदादांवरच हल्लाबोल

Vidya Chavan : चिंतन शिबिरातून अजितदादांची अस्वस्थता दिसली; विद्या चव्हाणांचा अजितदादांवरच हल्लाबोल

Vidya Chavan On Ajit Pawar : कर्जतमध्ये अजितदादा गटाचे (Ajit Pawar Group)चिंतन शिबीर (Chintan Shibir)झाले. त्याच्यामध्ये अजितदादांची अस्वस्थता दिसून आली आहे. सरळ आणि स्पष्ट खरं बोलणाऱ्या अजितदादांना खोटं बोल पण रेटून बोल हे बोलता येत नाही. आणि ते किती कठिण जातं? हे त्या शिबीरातून दिसून आल्याची परखड टीका राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या (NCP Sharad Pawar Group)नेत्या विद्या चव्हाण (Vidya Chavan)यांनी केली आहे. त्यांनी मुंबईमध्ये (Mumbai)माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी त्या बोलत होत्या.

Shilpa Shetty: अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा ‘सुखी’ ओटीटीवर टॉपला !

कर्जतमध्ये राष्ट्रवादी अजितदादा गटाचे दोन दिवसांचे चिंतन शिबीर झाले. त्यामध्ये अजितदादा आणि त्यांच्या गटातील नेत्यांनी थेट शरद पवारांवर जोरदार निशाणा साधला. त्यावरुन आता शरद पवार गटाच्या नेत्यांनी थेट प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर शरद पवार गटाच्या विद्या चव्हाण यांनी देखील अजितदादांवर परखड टीका केली आहे.

कोणी सोडून गेलं म्हणून चिंता करण्याचे कारण नाही, संघटना स्वच्छ झाली, पवारांचे अजितदादांना प्रत्युत्तर

यावेळी विद्या चव्हाण म्हणाल्या की, कर्जतमध्ये जे काही झालं ती लोकसभा निवडणुकीपूर्वीची रंगीत तालीम असावी, असं मला वाटतं. कारण भाजपचं अजितदादांवरील प्रेशर आता वाढत चाललं आहे. अजितदादांनी या सर्व विषयांवर आता बोललं पाहिजे म्हणून ते कालच्या चिंतन शिबिरामध्ये जे बोलले ते भाजपच्या सांगण्यावरुनच बोलल्याचा आरोपही यावेळी चव्हाण यांनी केला.

राज्यातील प्रश्नांपासून लक्ष विचलित करण्यासाठी ही वक्तव्य केली जात असल्याचेही यावेळी चव्हाण म्हणाल्या. अजितदादांनी राज ठाकरेंसारखा पक्ष काढून स्वत:चे अस्तित्व सिद्ध करावे. ज्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आहेत, त्या पक्षाचा अशाप्रकारे ताबा घेण्याचा प्रयत्न कऱणं हे अशोभनीय आहे. ईडी आणि इन्कमटॅक्सच्या धाडीनंतर अजित दादांपुढे कुठला पर्याय शिल्लक नव्हता असेही त्या म्हणाल्या.

पंतप्रधान मोदींनी मोस्ट करप्ट पार्टी असे म्हणताच काही दिवसात ही लोकं तिकडे गेली आहेत. लोक माझे सांगाती पुस्तकाच्या प्रकाशनावेळी झाले ते सर्व माध्यमांसमोर आहे. त्यामुळे अजितदादा अक्षरश: खोटं बोलत आहेत. शरद पवारांनी सांगितले, सुप्रिया सुळेंनी सांगितले, असं अजित पवारांनी वक्तव्य करणं चुकीचे आहे.

भाजपाचे आणि शरद पवारांचे विचार कधीच जुळले नाही, म्हणून ते गेले नाहीत, असेही यावेळी चव्हाण म्हणाल्या. त्याचवेळी भाजपाच्या सांगण्यावरुन अजितदादांनी बारामतीत कुणाला उभं केलच तर आम्हीही त्यासाठी सक्षम आहोत आणि मतदार सुज्ञ आहेत असेही विद्या चव्हाण म्हणाल्या.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube