Telangana Elections 2023 : तेलंगणातच गुलाबी वादळाला ब्रेक ! काँग्रेस मुसंडी मारणार ?

  • Written By: Published:
Telangana Elections 2023 : तेलंगणातच गुलाबी वादळाला ब्रेक ! काँग्रेस मुसंडी मारणार ?

Telangana Assembly Elections 2023: तेलंगणा विधानसभेसाठी (Telangana Assembly Elections 2023) आज मतदान झाल्यानंतर लगेच पाच राज्यांचे एक्झिट पोल आले आहेत. त्यानुसार तेलंगणा राज्यात सत्ताधारी के. चंद्रशेखर राव (KCR) यांच्या बीआरएसला (BRS) मोठा झटका बसताना दिसत आहे. या ठिकाणी बीआरएसची सत्ता जाईन काँग्रेस सत्तेत येईल, असे एक्झिट पोल काही संस्थांचे आहेत. तर भाजप व एमआयएमला मतदारांनी नाकारले असल्याचे एक्झिट पोलवरून दिसून येत आहे. देशभरात पक्षविस्तारासाठी निघालेले केसीआर यांचे गुलाबी वादळाला आता तेलंगणात ब्रेक लागल्याचे यातून स्पष्ट होत असल्याचे राजकीय विश्लेषक सांगत आहेत.

अमित शाह ठरले फेल, छत्तीसगडमध्ये पुन्हा कॉंग्रेसचीच मुसंडी? एक्झिट पोलची आकडेवारी समोर

तेलंगणाची विधानसभा 119 जागांची आहे. या जागांसाठी आज मतदान झाले आहे. चाणक्य संस्थेने काँग्रेसला सर्वाधिक 67-78 जागा दाखविल्या आहेत. तर बीआरएसला 22 ते 31 जागा दाखविल्या आहेत. भाजप आणि एमआयएमला मतदारांनी नाकारे असल्याचे चाणक्य संस्थेने आपल्या एक्झिट पोलमध्ये दाखविले आहे. भाजपला अवघ्या 6 ते 9 जागा आणि एमआयएमला अवघ्या 6 ते 7 जागा मिळण्याची शक्यता आहे.

Exit Poll 2023 MP : मध्यप्रदेशात कॉंग्रेसची बाजी? ‘इतक्या’ जागा जिंकणार; समोर आली आकडेवारी…

टाइम्स नाऊने मात्र तेलंगणा केसीआर राखतील, असा एक्झिट पोल दिला आहे. येथे बीआरएस सर्वाधिक 66 जागा जिंकले. तर काँग्रेस 37 जागांसह दुसऱ्या स्थानावर राहिल. भाजप व एमआयएलाही विशेष यश मिळताना दिसत नाही. येथे एमआयएमला व इतरांना केवळ नऊ जागा मिळताना दिसत आहे. सीएनएनच्या एक्झिट पोलनुसार काँग्रेस आणि बीआरएसमध्ये काँटे की टक्कर आहे. या संस्थेने काँग्रेसला 56 आणि बीआरएसला 48 जागा मिळू शकतात. भाजप व एमआयएमला या एक्झिट पोलमध्ये धक्का आहे.

दक्षिणेतील कर्नाटक राज्यात काँग्रेस सत्तेत आली आहे. त्यानंतर दक्षिणतील आणखी एक राज्य तेलंगणा काँग्रेसने जिंकल्यास या पक्षाच्या दक्षिण मोहिमेला आणखी बळ मिळणार आहे. तर केसीआर यांनी शेजारचे राज्य महाराष्ट्रात ताकद लावली आहे. केसीआर यांना देशभरात पक्षविस्तार करण्याची मनसुबे आहेत. तसे प्रयत्न सुरू आहेत. परंतु स्वतःचे राज्य तेलंगणा राखणेच केसीआर यांना अवघड झाल्याचे एक्झिट पोलमधून दिसून येत आहे.

चाणक्य-

काँग्रेस-67-78

बीआरएस-22-31

भाजप-6-9

एमआयएम-6-7

टाइम्स नाऊ-

बीआरएस-66

काँग्रेस-37

भाजप-7

एमआयएम व इतर-9

सीएनएन-

काँग्रेस-56

बीआरएस-48

भाजप-10

एक्झिट पोल
सीएनएन-

काँग्रेस-56

बीआरएस-48

भाजप-10

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube