Download App

विधानसभा निवडणुकीसाठी नितिश कुमारांनी खेळले आरक्षण कार्ड ! महिलांना नोकरीत तब्बल 35 टक्के आरक्षण

CM Nitish Kumar : महिलांचे मते पक्षाकडे आकर्षित करण्यासाठी नितेश कुमार यांनी महिला आरक्षणाचे कार्ड खेळले आहे.

  • Written By: Last Updated:

CM Nitish Kumar Announces 35% Reservation For Bihar Women: येत्या काही महिन्यात बिहार विधानसभेची (Bihar Assembly Election) निवडणूक होणार आहे. सत्ताधारी एनडीए आघाडी आणि विरोधकांनी निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे. त्यात बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (CM Nitish Kumar) यांनी एक मोठी खेळी केलीय. सरकारी नोकऱ्यांमध्ये महिलांना 35 टक्के (35% Reservation For Bihar Women) आरक्षणाचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. हे आरक्षण सर्व प्रकारच्या सरकारी नोकऱ्यांमध्ये असणार आहे. सर्व राज्यांमध्ये महिलांसाठी वेगवेगळ्या योजना आहेत. महाराष्ट्रात मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना आहे. त्याचा महायुती सरकारला विधानसभा निवडणुकीत झाला होता. महिलांचे मते पक्षाकडे आकर्षित करण्यासाठी नितेश कुमार यांनी महिला आरक्षणाचे कार्ड खेळले आहे. हे आरक्षण सर्व जातींना लागू राहणार आहे.

सर्व राज्य सरकारी सेवांमध्ये सर्व श्रेणी, स्तरप्रकाराच्या पदांवर थेट भरती केली जाणार आहे. बिहारच्या मूळ रहिवासी असलेल्या महिला उमेदवारांसाठी हे आरक्षण असणार आहे. सार्वजनिक सेवांमध्ये महिलांचे प्रतिनिधित्व वाढवण्यासाठी सरकारचा प्रयत्न असल्याचा नितीशकुमार यांनी म्हटले आहे. (CM Nitish Kumar Announces 35% Reservation For Bihar Women)

https://x.com/NitishKumar/status/1942458783827124536?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1942458783827124536%7Ctwgr%5E3fdcbaf1690b371f908df2a4ef5712f0a1b78100%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fwww.aajtak.in%2Fbihar%2Fstory%2Fbihar-assembly-election-35-percent-reservation-for-women-in-government-jobs-in-bihar-big-announcement-by-nitish-government-ntc-dskc-2282444-2025-07-08

तरुणांसाठी बिहार युवा आयोगाची स्थापना
त्याचबरोबर तरुणासाठी बिहार युवा आयोगाची स्थापना करण्याची घोषणा केलीय. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी एक्सवर पोस्ट करत ही घोषणा केलीय.
बिहारमधील तरुणांना जास्तीत जास्त रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, त्यांना प्रशिक्षण देणे आणि त्यांना मजबूत आणि सक्षम बनवणे या उद्देशाने, राज्य सरकारने बिहार युवा आयोग स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत बिहार युवा आयोगाच्या स्थापनेलाही मान्यता दिल्याचे नितीश कुमार यांनी सांगितले.

नशेखोरीविरुद्ध काम करेल आयोग
बिहार युवा आयोगामध्ये एक अध्यक्ष, दोन उपाध्यक्ष आणि सात सदस्य असणार आहे. त्यात 45 वर्ष कमी वयाच्या तरुणांना घेतले जाणार आहे. नशेखोरीविरुद्ध, खासगी क्षेत्रात युवकांना रोजगारामध्ये प्राधान्य देणे यावर काम करणार आहे.

follow us