Bihar CM Nitish Kumar : बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी मोठा दावा केला आहे. (Nitish Kumar) आगामी वर्षांत बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी नितीश कुमार (एनडीए) २२० जागा जिंकेल, असा विश्वास यांनी व्यक्त केला आहे. बिहारच्या विकासाची चक्रे वेगाने फिरविण्यासाठी राज्यातील लोक ‘एनडीए’लस पुन्हा सत्ता देऊ इच्छित आहेत, असंही ते म्हणाले आहेत. ते संयुक्त जनता दलाच्या कार्यकारिणीत बोलत होते.
२००५ च्या अगोदर बिहारची दुरवस्था सर्वांनाच ठाऊक आहे. कायदा आणि सुव्यवस्थेपासून ते शिक्षण, आरोग्य व्यवस्था सगळ्याच क्षेत्रात गोंधळ होता. सर्वत्र बोजवारा उडालेला होता. यावेळी भाषणात त्यांनी प्रशांत किशोर यांचं नाव न घेता टीका केली. गांधी जयंतीच्या दिवशी काहींनी मद्यबंदी मागं घेण्याची मागणी करणं चुकीचं आहे, असं नितीशकुमार म्हणाले. येत्या वर्षात बिहारमध्ये दहा लाख तरुणांना रोजगार दिला जाईल असं आश्वासनही त्यांनी दिलं आहे.
पश्चिम बंगाल पुन्हा हादरल! अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून खून, संतप्त जमावाने पोलीस स्टेशन पेटवलं
आपण किमान २२० जागा जिंकू याचा मला ठाम विश्वास आहे. अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली होती. मी बिहारचा मुख्यमंत्री व्हावं, असे अटलबिहारी वाजपेयी यांना वाटत होतं अशी आठवणही नितीश कुमार यांनी यावेळी सांगितली. त्याप्रमाणे २००५ मध्ये एनडीएत सेवा करण्याची संधी मिळाली. प्रत्येक क्षेत्रात आम्ही चांगलं काम केलं. लोकांना देखील त्याचा अनुभव येत आहे. राज्यात रस्ते आणि पुलांचे जाळे उभारले आहे. शाळांची डागडुजी केली आणि स्थितीत सुधारणा केली.
राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था चांगली केली आणि सरकारी रुग्णालयात उपचार घेणाऱ्यांची संख्या देखील वाढली आहे. मुलींना शाळेत आणि महाविद्यालयात जाण्यासाठी प्रोत्साहित केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांनी बिहारच्या विकासासाठी नेहमीच मदत केली आहे. तसंच, ‘जेडीयू’च्या नेत्यांनी एनडीए सरकारने केलेल्या कामांची माहिती जनतेपर्यंत पोचवावी, असं आवाहन नितीशकुमार यांनी केलं. सध्या मोबाईलचा जमाना आहे आणि पूर्वीच्या सरकारमध्ये बिहारमध्ये काय होत होतं आणि आता काय विकासकामे होत आहे, ते तुम्ही जनतेला सांगा, असेही नितीशकुमार या वेळी म्हणाले.