Download App

कपडे नाही दारुवर वाढलाय लोकांचा खर्च; ‘या’ अहवालातून धक्कादायक माहिती उघड

सीएमआयई (सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी) संस्थेचा एक अहवाल (CMIE Report) प्रसिद्ध झाला आहे.

Indian People Expenditure CMIE Report : देशातील सर्वसामान्य जनता कोणत्या गोष्टीवर सर्वाधिक पैसे खर्च करते (Indian People Expenditure Report) याचा एक अहवाल नुकताच समोर आला आहे. यातील माहिती धक्कादायक अशीच आहे. देशातील लोकांचा (Indian People) कपड्यांवरील खर्च कमी झाला आहे. तर अल्कोहोल, मद्यावरील खर्च वाढला आहे. चला तर मग जाणून घेऊ या की लोकांनी दारूवर किती खर्च केला आहे.

देशातील सर्वसामान्य माणूस आणि नागरिक कोणत्या (Indian Economy) वस्तूंवर किती पैसे खर्च करतात यासंदर्भात सीएमआयई (सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी) संस्थेचा एक अहवाल (CMIE Report) प्रसिद्ध झाला आहे. यात म्हटलं आहे की देशातील सामान्य माणूस कपड्यांच्या तुलनेत दारू पिण्यासाठी जास्त पैसे खर्च करतो.

रिपोर्टनुसार सन 2023-24 मध्ये लोकांनी आपल्या कमाईतील मोठा हिस्सा दारुसाठी खर्च केला. या वर्षात लोकांनी कपडे खरेदी करण्यासाठी 7.29 लाख कोटी रुपये खर्च केले आहेत. तर अल्कोहोल ड्रिंक्सवर 1.20 लाख कोटी रुपये खर्च केले आहेत. मागील वर्षाचा विचार केला तर लोकांनी कपडे खरेदी करण्यावर कमी खर्च केला आहे. दारू खरेदी करण्यासाठी मात्र जास्त पैसे खर्च केले आहेत.

एलआयसीची खास योजना, मिळणार 19 लाख, गुंतवणूक फक्त 150 रुपये

सन 2022-23 या आर्थिक वर्षात लोकांनी कपडे खरेदीसाठी 7.60 लाख कोटी रुपये खर्च केले होते. 2023-24 मध्ये हा खर्च 7.29 लाख कोटी रुपयांवर आला. दारूचा विचार केला तर दारूच्या वापरावरील खर्चात 26 टक्क्यांनी वाढ झाली आहे. सन 2022-23 मध्ये लोकांनी अल्कोहोल ड्रिंक्सवर 0.95 लाख कोटी रुपयांचा चुराडा केला होता. 2023-24 मध्ये यात वाढ होऊन हा खर्च 1.20 लाख कोटींवर पोहोचला आहे.

‘या’ वस्तूंवरील खर्च वाढला

रिपोर्टनुसार लोकांनी 2022-23 च्या तुलनेत 2023-24 मध्ये धान्य, डाळी, दूध, अंडी, चीज, फळे आणि भाजीपाला या वस्तूंवर खर्च वाढवला आहे. या दैनंदिन गरजेच्या वस्तूंवर खर्च वाढवला आहे. चॉकलेट, जॅम, साखर या वस्तूंच्या खर्चात 19.78 टक्के वाढ झाली आहे. आरोग्यावरील खर्च 18.75 टक्क्यांनी वाढला आहे. रिपोर्टमध्ये दिलेली माहिती थोडी आश्चर्यकारक आहे.

लोकांनी साखर, चॉकलेट, जॅम यांसारख्या वस्तूंवर खर्च वाढवला आहे पण तेल आणि फॅट्सवर होणारा खर्च कमी केला आहे. हा खर्च 19.67 टक्क्यांनी कमी झाला आहे. आरोग्यावर खर्च वाढला आहे. कोरोनानंतर लोकांत आरोग्याबाबत जागरूकता वाढली आहे. आरोग्य विम्याच्या प्रीमियमवरील खर्चात मागील वर्षाच्या तुलनेत 3.39 टक्क्यांची घट झाली आहे. इंटरनेट आणि संचाराच्या खर्चात 8 टक्क्यांनी वाढ झाली आहे. पण मनोरंजनावरील खर्चात 1.38 टक्क्यांची घट झाली आहे.

‘झणझणीत मिसळ’, ‘छोले भटुरे’ अन् ‘स्वादिष्ट पराठा’, बेस्ट ब्रेकफास्ट यादीत 3 भारतीय डिश

follow us