एलआयसीची खास योजना, मिळणार 19 लाख, गुंतवणूक फक्त 150 रुपये

New Children Money Back Plan : तुमच्या मुलांच्या भविष्याचा विचार करुन तुम्ही आतापासूनच कमी गुंतवणूकीमध्ये जास्त परतावा देणाऱ्या योजनेत गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी देशाची सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसीने (LIC) एक खास योजना आणली आहे. या योजनेत तुम्ही गुंतवणूक करुन तब्बल 19 लाखांचा निधी जमा करु शकतात. या योजनेत तुम्हाला दररोज फक्त 150 रुपयांची गुंतवणूक करावी लागणार आहे. एलआयसीच्या या नवीन योजनेचे नाव न्यू चिल्ड्रन्स मनी बँक प्लॅन (New Children’s Money Bank Plan) योजना आहे. ही एक नॉन-लिंक्ड, पार्टिसिपेटिंग योजना आहे. यामध्ये मूल 0 ते 12 वर्षांच्या दरम्यान असताना तुम्ही गुंतवणूक सुरू करू शकता.
19 लाख रुपयांचा निधी
एलआयसीच्या न्यू चिल्ड्रन्स मनी बँक योजनेत जर तुम्ही तुमच्या मुलाच्या जन्माच्या वेळेपासून गुंतवणूक केली आणि दररोज 150 रुपये जमा केल्या तर या दरमहा या योजनेत तुमची गुंतवणूक 4500 रुपये होणार. तर एका वर्षात ही रक्कम 55 हजार रुपये होणार आणि 25 वर्षात ही रक्कम 14 लाख रुपये होणार. पॉलिसीच्या परिपक्वतेवर मिळणारा बोनस आणि व्याज जोडल्यानंतर, ही रक्कम सुमारे 19 लाख रुपयांपर्यंत असू शकते, जी मुलाचे शिक्षण किंवा लग्न यासारख्या प्रमुख खर्चांना भाग पाडण्यास मदत करेल. तुम्ही या योजनेत मासिक, तिमाही, सहामाही किंवी वार्षिक आधारावर गुंतवणूक करु शकतात.
तुम्हाला पैसे कधी परत मिळतील?
जेव्हा तुमचे मूल 18, 20, 22 आणि 25 वर्षांचे होते, तेव्हा या योजनेनुसार गुंतवणुकीचा काही भाग तुम्हाला परत केला जातो. 18, 20 आणि 22 वर्षांच्या वयात, विमा रकमेच्या 20- 20% परत केला जातो. 25 वर्षांच्या वयात, उर्वरित 40% बोनससह दिला जातो.
गुंतवणुकीची मर्यादा
या योजनेत किमान रक्कम 1 लाख रुपये आहे. कमाल मर्यादा निश्चित केलेली नाही, म्हणजेच, तुम्ही तुमच्या आर्थिक क्षमतेनुसार तुम्हाला हवे तितके गुंतवणूक करू शकता. योजनेचा कालावधी 25 वर्षांचा आहे. जर पॉलिसीधारकाचा पॉलिसी कालावधी पूर्ण होण्यापूर्वी मृत्यू झाला, तर नॉमिनीला एक निश्चित रक्कम दिली जाते. ही रक्कम भरलेल्या एकूण प्रीमियमच्या किमान 105% आहे (काही वजावटीनंतर), आणि ही रक्कम विमा आणि जमा झालेल्या बोनसपेक्षा देखील जास्त असू शकते.
तर दुसरीकडे एलआयसीने दिलेल्या माहितीनुसार, या योजनेत गुंतवणूक केल्यानंतर तुम्हा दोन वर्षांनी कर्ज सुविधा देखील उपलब्ध होते. तुम्ही काही अटींसह हे कर्ज मुलाच्या शिक्षणासाठी, लग्नासाठी किंवा इतर कारणासाठी घेऊ शकतात.