चीनसोबत मोठा करार; खनिजांच्या बदल्यात चिनी विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये प्रवेश; डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा

US-China Trade : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज मोठी घोषणा करत चीनसोबत व्यापार करार (US-China Trade) पूर्ण झाला असल्याची

US China Trade

US-China Trade : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज मोठी घोषणा करत चीनसोबत व्यापार करार (US-China Trade) पूर्ण झाला असल्याची माहिती दिली आहे. डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी दिलेल्या माहितीनुसार, या करारांतर्गत चीन (China) अमेरिकेला दुर्मिळ खनिजे (Rare Minerals) आणि चुंबकांचा पुरवठा देणार आहे तर या बदल्यात अमेरिका चीनी विद्यार्थ्यांना (Chinese Students) अमेरिकेच्या विद्यापीठांमध्ये आणि महाविद्यायांमध्ये प्रवेश देणार आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी या कराराला राजनैतिक विजय म्हटले आहे. तसेच हा करार अजूनही त्यांच्याकडे आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याकडे अंतिम मंजुरीसाठी असल्याची माहिती दिली आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ट्रुथ वर लिहिले की, चीनसोबत आमचा करार पूर्ण झाला आहे, जो माझ्या आणि राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या अंतिम मंजूरीच्या अधीन आहे. चीन आम्हाला सर्व चुंबक आणि सर्व आवश्यक दुर्मिळ खनिजे देणार आहे. त्या बदल्यात आम्ही चीनी विद्यार्थांना आमच्या महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये शिक्षण घेण्याची परवानगी देणार आहोत. आम्हाला 55 टक्के कर मिळत आहे तर चीनला 10 टक्के. आमचे संबंध उत्तम आहे. असं ट्रम्प यांनी ट्रुथ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिले आहे.

 

दुर्मिळ खनिजांमुळे संबंध बिघडले

दोन्ही देशांमध्ये मे 2025 मध्ये दुर्मिळ खनिजांमुळे व्यापर संबंघ बिघडले होते. त्यामुळे दोन्ही देशांमध्ये तणाव वाढला होता पण आता दोन्ही देशांत व्यापार करार झाल्याने तणाव कमी होणार आहे. ज्याचा फायदा दोन्ही देशांसह जगाला होणार आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस; भिंत कोसळून दोन महिलांचा मृत्यू

अमेरिकन आणि चिनी अधिकाऱ्यांनी सांगितले की दोन्ही देशांनी एक चौकट तयार केली आहे, ज्यामुळे व्यापार करार पुन्हा रुळावर येईल. यामध्ये चीनने दुर्मिळ खनिजांवर लादलेली निर्यात बंदी हटवणे देखील समाविष्ट आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube