Download App

CNG-PNG : केंद्राचा नवा फॉर्मुला, सीएनजी-पीएनजीच्या किंमती दर महिन्याला बदलल्याने ‘हा’ फायदा

CNG-PNG Gas : दर महिन्याच्या सुरूवातील देशातील तेल कंपन्या इंधनांच्या किंमती जाहीर करत असतात.त्यामध्ये पेट्रोल-डिझेल ऐवजी गाड्या आणि घरांमध्ये वापरल्या जाणाऱ्या सीएनजी-पीएनजीच्या किंमती मात्र दर सहा महिन्यांनी निश्चित होत असतात. मात्र आता केंद्र सरकारने नवा फॉर्मुला आणला आहे त्यानुसार पेट्रोल-डिझेल आणि एलपीजी गॅस प्रमाणे सीएनजी-पीएनजीच्या (CNG-PNG) किंमतीही दर महिन्याला बदलणार आहेत. त्यामुळे नेमका काय फायदा होणार? काय आहे केंद्र सरकारचा नवा फॉर्मुला? जाणून घेऊ…

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर (Anurag Thakur) यांनी ही माहिती दिली की, आता घरगुती गॅसच्या किंमती आंतरराष्ट्रीय गॅस हब ऐवजी इंपोर्टेड क्रूडसोबत लिंक करण्यात आले आहे. त्यामुळे आता सीएनजी-पीएनजीच्या किंमती तब्बल 10 टक्क्यांनी कमी होणार आहेत. त्याचबरोबर आता पेट्रोल-डिझेल आणि एलपीजी गॅसप्रमाणे सीएनजी-पीएनजीच्या किंमतीही दर महिन्याला बदलणार आहेत.

काय आहे केंद्र सरकारचा नवा फॉर्मुला?

– घरगुती गॅसच्या किंमतींसाठी ऑक्टोबर 2014 मध्ये गाईडलाईन ठरवण्यात आल्या होत्या. त्यानुसार आंतरराष्ट्रीय बाजारामधील किंमतींच्या आधारे देशात घरगुती गॅसच्या किंमती ठरत होत्या.

– आता सरकारने ऑक्टोबर 2022 मध्ये किरीट पारिख यांच्या अध्यक्षतेखाली समीती बनवली होती. त्यांनी दिलेल्या गाईडलाईन्सनुसार घरगुती गॅसच्या किंमती आंतरराष्ट्रीय गॅस हब ऐवजी इंपोर्टेड क्रूडसोबत लिंक करण्यात आले आहे.

– त्यामुळे आता सीएनजी-पीएनजीच्या किंमती तब्बल 10 टक्क्यांनी कमी होणार आहेत. म्हणजे इंडियन क्रुड बास्केटची किंमत 85 डॉलर आहे तर भारतात घरगुती गॅसची किंमत 8.5 डॉलर म्हणजे इंडियन क्रुड बास्केटची किंमतीच्या 10 टक्के असेल.

– त्याचबरोबर आता पेट्रोल-डिझेल आणि एलपीजी गॅसप्रमाणे सीएनजी-पीएनजीच्या (CNG-PNG) किंमतीही दर महिन्याला बदलणार आहेत. घरगुती गॅसची फ्लोर प्राईस आणि सीलिंग प्राईस दोन्ही यामध्ये ठरवल्या जाणार आहेत. फ्लोर प्राइई 4 डॉलर आणि सीलिंग प्राईस 6.5 डॉलर ठरवण्यात आली आहे. दोन वर्षांनंतर या किंमती वाढवण्यात येणार आहेत.

Corona Alert : कोरोनावाढीवर केंद्र सरकार अलर्ट मोडवर; दिले मॉक ड्रिलचे आदेश

नेमका काय फायदा होणार?

– 1 नोव्हेंबर 2014 ला ज्या गाईडलाईन्स जारी करण्यात आल्या होत्या. गाड्या आणि घरांमध्ये वापरल्या जाणाऱ्या सीएनजी-पीएनजीच्या किंमती मात्र दर सहा महिन्यांनी निश्चित होत होत्या.

– त्यामुळे या सहा महिन्यांमध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात किंमती वाढल्यास गॅस कंपन्यांना आणि किंमती कमी झाल्यास नागरिकांचे नुकसान होत होतं. कारण किंमती 6 महिन्यांसाठी ठरलेल्या होत्या.

– मात्र आता सीएनजी-पीएनजीच्या किंमतीही दर महिन्याला बदलणार आहेत. किंमती वाढल्यास गॅस कंपन्यांना आणि किंमती कमी झाल्यास नागरिकांना फायदा होणार आहे. तसेच या किंमती आंतरराष्ट्रीय गॅस हब ऐवजी इंपोर्टेड क्रूडच्या आधारे ठरवण्यात येणार आहे.

– त्याचबरोबर फ्लोर प्राईस आणि सीलिंग प्राईस दोन्ही निश्चित करण्यात आल्याने किंमती कमी झाल्याने गॅस कंपन्यांना आणि किंमती वाढल्याने नागरिकांना ही नुकसान होणार नाही.

Tags

follow us