Download App

अंबानींचं मोठं पाऊल! चीनला दणका, भारत प्लास्टिकचे जागतिक केंद्र बनणार

Mukesh Ambani Ethane Import India Global Plastic Hub : आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) पुन्हा एकदा चर्चेत आहेत. यावेळी कारण अमेरिकेतून इथेन गॅसची मोठी आयात आहे, ती आधी चीनला पाठवली जात होती. पण आता भारतात येत आहे. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या व्यापार युद्धामुळे जगात एक मोठा बदल झालाय, ज्यामुळे भारताला चांगली संधी मिळाली आहे. अंबानींची कंपनी रिलायन्स गुजरातमधील दहेजमध्ये हा गॅस उतरवण्याची तयारी करत आहे. या गॅसचा वापर प्लास्टिक (Plastic Hub) बनवण्याचे साहित्य इथिलीन बनवण्यासाठी केला जाईल. यामुळे भारत प्लास्टिकचे जागतिक केंद्र बनेल.

इथेन गेममध्ये अंबानींची पैज

मुकेश अंबानी यांनी सुमारे एक दशकापूर्वी अमेरिकन इथेनवर पैज लावली होती. त्यांची कंपनी रिलायन्सने 2017 मध्ये गुजरातमधील दहेज येथे इथेन क्रॅकर युनिट सुरू केले, जे जगातील अशा प्रकारचा पहिला मोठा उपक्रम होता. त्यावेळी रिलायन्सने असा दावा केला होता की उत्तर अमेरिकेतून इथेन आयात करणारी ती पहिली कंपनी होती. आज ही दूरदृष्टी व्यापार करारांमध्ये भारतासाठी एक मोठे शस्त्र ठरू शकते.

रिलायन्सचे हे पाऊल केवळ व्यापारापुरते मर्यादित नाही. नैसर्गिक वायूचा एक भाग असलेले इथेन प्लास्टिक बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. हा रंगहीन, गंधहीन वायू आहे, जो विशेष जहाजांमध्ये द्रव स्वरूपात आणला जातो. सध्या, असेच एक जहाज, STL कियानजियांग, अमेरिकेच्या आखाती किनाऱ्यावरून दहेजला जात आहे. रिलायन्सकडे अशी सहा जहाजे आहेत. कंपनी आता आणखी तीन जहाजे जोडण्याची योजना आखत आहे.

इथेन का खास आहे?
पूर्वी, रिलायन्स आणि इतर रिफायनरीज प्लास्टिक बनवण्यासाठी कच्च्या तेलापासून बनवलेल्या नॅफ्थाचा वापर करत असत. परंतु नॅफ्थापासून फक्त 30% इथिलीन बनवता येते, तर इथेनपासून हा आकडा 80% पर्यंत पोहोचतो. म्हणजेच, इथेन अधिक किफायतशीर आणि प्रभावी आहे. ऊर्जेच्या बाबतीत, इथेन हे नॅफ्थापेक्षा जवळजवळ निम्मे स्वस्त आहे. पूर्वी, भारतात इथेनला तेवढे प्राधान्य मिळत नव्हते. कतारमधून येणाऱ्या नैसर्गिक वायूमध्येही इथेन वेगळे केले जात नव्हते. पण आता परिस्थिती बदलत आहे. कतार एनर्जीने भारताच्या ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन सोबतच्या नवीन करारात स्पष्टपणे म्हटलंय की, ते फक्त ‘लीन’ गॅस देतील. जर इथेनची आवश्यकता असेल, तर त्यासाठी वेगळे पैसे द्यावे लागतील.

Video : आमच्या पैशांवर जगता, आपटून-आपटून मारू; भाजप खासदाराने महाराष्ट्राविरूद्ध गरळ ओकली

ओएनजीसीनेही या दिशेने पावले उचलली आहेत. दोन मोठ्या इथेन वाहकांसाठी जपानच्या मित्सुई ओएसके लाईन्सशी करार केला आहे. परंतु रिलायन्सने आधीच हा खेळ जिंकला आहे. कंपनी आता दहेज ते गुजरातमधील त्यांच्या दुसऱ्या युनिटपर्यंत 100 किमी लांबीची पाइपलाइन टाकण्याची योजना आखत आहे. इथेनचा वाढता वापर भारताच्या तेल-आधारित अर्थव्यवस्थेत मोठा बदल घडवून आणू शकतो. सध्या, भारतातील रिफायनरीज प्रामुख्याने मध्य पूर्वेतून येणाऱ्या कच्च्या तेलावर अवलंबून आहेत. परंतु जर इथेनचा वापर वाढला तर काही रिफायनरीज तोट्यात जाऊ शकतात. पॉलिस्टर, डिटर्जंट्स, खते आणि सौंदर्यप्रसाधने बनवण्यात पूर्वी महत्त्वाची भूमिका बजावणारे नॅफ्था आता मागे पडू शकते.

भारतातील तेल उद्योग आता एका नवीन टप्प्यात प्रवेश केला आहे. गेल्या वर्षी, देशातील सर्वात मोठ्या कार उत्पादक कंपनीच्या सुमारे एक तृतीयांश गाड्या सीएनजीवर चालत होत्या. प्रदूषण कमी करण्यासाठी आणि परदेशी तेलावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी, सरकारने पेट्रोलमध्ये 20% बायो-इथेनॉल जोडण्याचा नियम बनवला आहे. तसेच, इलेक्ट्रिक वाहनांच्या वाढत्या मागणीमुळे पेट्रोलचा वापर देखील कमी होत आहे. असे असूनही, एक सरकारी कंपनी आंध्र प्रदेशात दरवर्षी 9 दशलक्ष टन क्षमतेची नवीन रिफायनरी बांधत आहे. तज्ञांचे मत आहे की, हा प्रकल्प केवळ अनुदान आणि रोजगाराच्या लोभासाठी चालवला जात आहे, कारण त्याच्या गुंतवणुकीला फारसा आर्थिक अर्थ नाही.

Gauri Nalawade : गौरीचे ऑफ-शोल्डर बॉडीकॉन ड्रेसमध्ये हटके फोटोशूट

ट्रम्प आणि अंबानी यांची मैत्री
मुकेश अंबानी यांचे हे पाऊल केवळ भारतासाठीच नाही तर अमेरिकेसाठीही फायदेशीर ठरू शकते. ट्रम्प यांच्या व्यापार युद्धामुळे अमेरिकन इथेनच्या मागणीवर प्रश्न उपस्थित झाले आहेत. चीन या गॅसचा मोठा खरेदीदार होता, परंतु आता भारत त्याची जागा घेऊ शकतो. जरी भारत चीनइतके इथेन खरेदी करू शकत नसला तरी, अमेरिकन बाजारपेठेतील अतिरेकी पुरवठा कमी करण्यास ते निश्चितच मदत करू शकते.

 

follow us