Priyanka Gandhi : हिमाचल प्रदेश आणि कर्नाटकातील विजयानंतर आता प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) या वर्षाच्या अखेरीस तेलंगाणा आणि मध्य प्रदेशात होणाऱ्या निवडणुकांमध्ये पक्षाच्या प्रचाराची धुरा सांभाळणार आहेत. मध्य प्रदेशात येत्या 12 जून रोजी एक रॅली आयोजित करण्यात आली आहे. छत्तीसगडमध्येही निवडणुका आहेत त्यामुळे या राज्यावरही त्यांचे लक्ष राहणार आहे.
मागील वर्षात उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत प्रियंका गांधी यांनी महिलांवर जास्त लक्ष केंद्रीत केले होते. त्यांनी प्रचारात महिलांसाठी काही आश्वासनेही दिली. त्याच पद्धतीने कर्नाटकात प्रचार करण्यात आला. महिलांसाठी मोठ्या घोषणा केल्या. त्याचा फायदा काँग्रेसला मिळाला. आताही आगामी निवडणुकीत काँग्रेसच्या प्रचारात महिलांना प्राधान्य देण्यात येणार असल्याचे समजते. हा नवा ट्रेंड काँग्रेसच्या प्रचार तंत्रात (Congress Campaign Politics) मोठ्या प्रमाणात वापरला जात आहे.
Polluted Cities In India : प्रदुषित शहरांच्या यादीत भिवंडी शहर तिसऱ्या क्रमांकावर…
काँग्रेस महिला उमेदवारांची संख्या वाढविण्यावरही भर देणार आहे. आधी प्रियंका यांनीच ही कल्पना सांगितली होती. तरी देखील यासाठी आगामी काळात प्रयत्न केले जाणार असल्याचे पक्षातील नेत्यांनी सांगितले. हिमाचल प्रदेशच्या निवडणुकीतही प्रियांका गांधी यांनी जोरदार प्रचार केला. त्याचा परिणाम असा झाला की येथे पक्षाने 40 जागा जिंकत सरकारही बनवले. भाजपला फक्त 25 जागा मिळाल्या.
जेडीएसचा बालेकिल्ला ध्वस्त
कर्नाटकातही त्यांच्या प्रचाराची शैली वेगळी होती. जिंकण्यावर लक्ष केंद्रीत करून त्यांनी प्रचार केला. प्रियांका गांधी यांनी येथे 36 रॅली आणि रोड शो केले. यामध्ये त्यांचा स्ट्राइक रेट 72 टक्के होता. मंड्या हा जनता दलाचा बालेकिल्ला होता. मात्र काँग्रेसने हा बालेकिल्ला ध्वस्त केला. ही निवडणूक मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी होऊ नये म्हणून पंतप्रधान मोदींच्या आक्रमक प्रचाराला प्रत्युत्तर देण्याची जबाबदारीही प्रियंका यांनीच सांभाळली. बजरंग दलावर बंदी घालण्याची घोषणा काँग्रेसने जाहीरनाम्यात केली होती. मात्र, यावर काँग्रेसने स्पष्टीकरण दिले. मात्र, प्रियंका गांधी यांनी यावर काहीच भाष्य केले नाही.
Video : भर भाषणात मुख्यमंत्री केजरीवालांना अश्रू अनावर; म्हणाले मनीष सिसोदिया लवकरच…
तेलंगणात काँग्रेसचा संघर्ष
तेलंगाणात काँग्रेस अस्तित्वासाठी संघर्ष करत आहे. दुसरीकडे भाजपने आक्रमक होत सत्ताधारी बीआरएसला घेरले आहे. या दरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी जास्तीत जास्त वेळा तेलंगाणाचा दौरा करून संघटना आणि काँग्रेसची मोहिम आधिक बळकट करण्याची सूचना दिली आहे. त्यानुसार प्रियंका गांधी यांनी सुरुवात केली आहे. कर्नाटकचा प्रचार संपल्यानंतर काही तासांनंतरच त्यांनी हैदराबादमध्ये रॅलीला संबोधित केले.