Download App

बलात्काराचे आरोप झालेल्या नेत्याचे अश्लिल व्हिडिओ व्हायरल, कॉंग्रेसने केली हकालपट्टी

  • Written By: Last Updated:

Mewaram Jain : राजस्थानमधील बारमेर येथील काँग्रेसचे माजी आमदार मेवाराम जैन (Mewaram Jain) हे एका बलात्कार प्रकरणात अडकल्याने पक्षाने त्यांना निलंबित केले आहे. प्रदेश काँग्रेस अध्यक्ष गोविंद सिंग दोतासरा यांनी 6 जानेवारीच्या रात्री उशिरा निलंबनाचे (suspension) आदेश दिले आहेत. मेवाराम जैन यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 6 जानेवारी रोजी त्यांचे दोन कथित अश्लिल व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यानंतर पक्षाने हा निर्णय घेतला आहे.

नगर अर्बन बँक गैरकारभाराची एसआयटी चौकशी…कोणी केली मागणी? 

दोन कथित अश्लील व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पक्षाने मेवाराम यांच्यावर मोठी कारवाई केली आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक पुरुष महिलांसोबत अश्लील कृत्य करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये दिसत असलेल्या व्यक्तीचे नाव मेवारम जैन असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही. मात्र, या व्हिडिओवरून भाजपने टीका करताच काँग्रेसने शनिवारी रात्री उशिरा मेवाराम जैन यांना पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वातून निलंबित केले. पीसीसी प्रमुख गोविंद सिंग दोतासारा यांनी निलंबनाचे आदेश जारी केले आहेत.

‘काही जणांचं वय 84 झालं तरी थांबेना, अरे थांबा ना!’ अजितदादांच्या निशाण्यावर पुन्हा शरद पवार

राजस्थानमध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी एक कथित अश्लील व्हिडिओची चर्चा होती, जो शुक्रवारी अचानक सोशल मीडियावर व्हायरल झाला. व्हिडिओमध्ये दिसणारी व्यक्ती 70 वर्षीय माजी आमदार आणि माजी मंत्री मेवाराम जैन असल्याचा दावा केला जात आहे.

संपूर्ण प्रकरण काय?
संमारे 15 दिवसांपूर्वी एका महिलेने जोधपूरमधील राजीव नगर पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. पीडित महिलेने आरोप केला आहे की मेवाराम आणि त्यांचे सहकारी रामस्वरूप आचार्य यांनी तिच्यावर बलात्कार केला आणि 15 वर्षांच्या मुलीवरही लैंगिक अत्याचार केले. हे प्रकरण उच्च न्यायालयात पोहोचले. न्यायालयाने मेवाराम यांच्या अटकेला 25 जानेवारीपर्यंत स्थगिती दिली. आणि पुढील तपासाचे आदेश दिले.

एका वृत्तानुसार, पीडितेने आरोप केला आहे की, माजी आमदाराने तिच्यावर बलात्कार करताना व्हिडिओही बनवला होता. मेवाराम जैन आणि रामस्वरूप यांनी तिच्या अल्पवयीन मुलीवरही बलात्कार केल्याचा आरोप केला होता. तेच व्हिडिओ आता व्हायल झाल्याचं बोलल्या जातं आहे.

कोण आहेत मेवाराम जैन?
मेवाराम जैन हे बाडमेरमधून सलग तीन वेळा आमदार होते, पण भाजपच्या बंडखोर प्रियांका चौधरी यांच्याकडून त्यांना या निवडणुकीत पराभव पत्करावा लागला. यापूर्वी एका महिलेने मेवराम यांच्यावर बलात्काराचा आरोप केला होता. याप्रकरणी उच्च न्यायालयाने सध्या त्यांच्या अटकेला स्थगिती दिली आहे. जोधपूरच्या राजीव नगर पोलिस ठाण्यात मेवाराम जैन यांच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता.

https://www.youtube.com/watch?v=loJnNJZKYeY

पीडितेविरुद्ध लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल
आरोपी राम स्वरूप आचार्य यांनी पीडितेविरुद्ध बाडमेर कोतवाली पोलिस ठाण्यात लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल केल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. यामध्ये पीडित महिला आणि तिच्या साथीदारांकडून 50 लाख रुपये घेतल्याचा आणि पैशांची मागणी केल्याचा आरोप होता. या संपूर्ण प्रकरणावर आरोपी मेवाराम जैन यांच्याकडून अद्याप कोणतेही वक्तव्य आलेले नाही.

follow us