POK : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी काल संसदेत भाषणात माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या चुकीमुळेच पाकव्याप्त काश्मीरचा (POK) प्रश्न निर्माण झाल्याचे सांगितले. त्यांच्या या वक्तव्यावर काँग्रेसच्या खासदारांनी प्रचंड गदारोळ केला. त्यानंतर आता काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी (Adhir Ranjan chowdhury) यांनी भाजपला थेट आव्हान दिलं आहे. पीएम मोदी (PM Modi) आणि अमित शहांनी पीओकेतील किमान एकतरी सफरदंच आणून दाखवावं. जर हिंमत असेल तर 2024 च्या निवडणुकीआधी (Lok Sabha Election) पीओके ताब्यात घेऊन दाखवा. संपूर्ण देश भाजपला मतदान करील, असे आव्हान चौधरी यांनी मोदी-शहांना दिले. तसेच त्यांनी मोदी-शहांचा भारतातील शूर असा उपहासात्मक उल्लेख केला.
काल अमित शहा यांनी काँग्रेसच्या जम्मू काश्मीरबाबतच्या धोरणावर जोरदार टीका केली. पाकव्याप्त काश्मीरची समस्या माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यामुळेच उत्पन्न झाली होती. सगळा काश्मीर भारताच्या हातात येण्याआधीच युद्धविरामाची घोषणा केली गेली. जर ही घोषणा केली गेली नसती तर आज पीओके सुद्धा भारताचाच हिस्सा राहिला असता. शाह यांच्या या वक्तव्यानंतर संसदेत विरोधकांनी जोरदार गदारोळ घातला. त्यानंतर लोकसभेतून वॉकआउट केले होते.
Amit Shah : ‘नेहरूंच्या चुकीमुळचे ‘POK’ चा वाद’ अमित शहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
याच मुद्द्यावर चौधरी यांनी मोदी-शहांवर टीका करत त्यांना आव्हान दिले. पीओकेतील किमान एकतरी सफरचंद आणून दाखवा. मग सांगा आम्ही हे करून दाखवलं. पीओकेत चीन पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडोर तयार केला जात आहे. यावर मोदी आणि शहा यांनी मौन का बाळगले आहे असा सवाल चौधरी यांनी विचारला.
पीओके पाकिस्तानच्या ताब्यातून सोडून दाखवा. जे काँग्रेसला जमलं नाही असं तुम्ही म्हणता ते तु्म्ही तरी करून दाखवा. तेथून किमान एकतरी सफरचंद आणून दाखवा. हिंमत असेल तर बहादुरीच्या बाता मारणाऱ्या दोन्ही बहादुरांनी पाकिस्तानच्या ताब्यातील पीओके खेचून भारताच्या कब्जात आणावा. आता 2024 मध्ये लोकसभा निवडणुका आहेत. त्याआधी पीओके भारताच्या ताब्यात आणून दाखवा, सगळा देश भाजपला मतदान करील, असे चौधरी म्हणाले.
jammu kashmir मध्ये भारतील लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, पाच दहशतवाद्यांचा खात्मा
अमित शहांनी स्वीकारलं चॅलेंज
काल लोकसभेतील चर्चेत अधीर चौधरी यांनी आव्हान देताना म्हटले होते की एक दिवस निश्चित करा आणि पंडित नेहरूंनी काश्मीर प्रकरणात काय योगदान दिले यावर चर्चा करा. भाजप नेत्यांकडून वारंवार असा आरोप केला जात आहे की काश्मीर प्रश्न नेहरूंनी योग्य पद्धतीने हाताळला नाही. यावर शहा यांनी उत्तर देत सरकार हे आव्हान स्वीकारत असल्याचे सांगितले होते.