Download App

इंदिरा गांधींचा तिसरा मुलगा काँग्रेस सोडेल? कमलनाथांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा पक्षाने फेटाळल्या

  • Written By: Last Updated:

Congress leader KamalNath : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री आणि प्रदीर्घ काळापासूनचे काँग्रेसचे दिग्गज नेते कमलनाथ (Congress leader KamalNath) लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. मात्र या चर्चांवर कॉंग्रेसकडून प्रतिक्रिया आली आहे. यावर कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह (Digvijay Singh) यांनी सांगितले की, इंदिरा गांधी यांनी कमलनाथ यांना आपला तिसरा मुलगा मानले होते. त्यामुळे त्यांनी काँग्रेस पक्ष सोडण्याचा प्रश्नच येत नाही. असं म्हणत या अफवा फेटाळून लावल्या आहेत.

Ind VS Eng: यशस्वीने शानदार शतक झळकविले; पण आनंदाच्या भरात केलेली चूक आली अंगलट

पत्रकारांनी दिग्विजय सिंह यांना कमलनाथ लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. यावर प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, त्यांनी पक्ष सोडण्याचा प्रश्नच येत नाही. दिग्विजय सिंह पुढे सांगितले की, कमलनाथ यांनी त्यांचे राजकीय करिअर नेहरू-गांधी परिवारासोबत सुरू केलं आहे. तसेच माझं रात्रीच कमलनाथ यांच्याशी बोलणं झालं. ते छिंदवाडा या ठिकाणी होते. तसेच इंदिरा गांधी यांनी कमलनाथ यांना आपल्या तिसरा मुलगा मानले होते. त्यामुळे त्यांनी काँग्रेस पक्ष सोडण्याचा प्रश्नच येत नाही. असं म्हणत दिग्विजय सिंह यांनी कमलनाथ यांच्या भाजपमध्ये जाण्याचे चर्चा फेटाळून लावल्या.

चिपळूण राड्याप्रकरणी ठाकरे गटाच्या तिघांना अटक, 300 ते 400 जणांवर गुन्हा दाखल

तसेच या अगोदर स्वतः कमलनाथ यांनी या सगळ्या चर्चांवर एकाच ओळीत उत्तर दिले आहे. पत्रकारांनी कमलनाथ यांना भाजपमध्ये प्रवेश करण्याबाबत विचारले असता ते म्हणाले की, असे काही घडले तर मी तुम्हाला आधी कळवीन. या दरम्यान, त्यांनी कुठेही या चर्चांना फुलस्टॉप दिला नाही. यासोबत छिंदवाडा येथील त्यांचा नियोजित कार्यक्रम रद्द करून अचानक दिल्ली दौरा जाहीर झाला आहे. त्यामुळे त्यांच्या भाजप प्रवेशावर शिक्कामोर्तब झाल्याचे सांगण्यात येत आहे.

तसेच मध्य प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जितू पटवारी यांनी या चर्चांना पूर्णविराम दिला. ते म्हणाले की, इंदिरा गांधीजींनी कमलनाथ यांना आपला तिसरा मुलगा मानले होते. आम्ही प्रत्येक परिस्थितीत काँग्रेसच्या खांद्याला खांदा लावून उभे राहु. प्रत्येक भूमिकेत ते निर्भयपणे आपले काम करत आले आहेत. जेव्हा सिंधियाजींनी काँग्रेस सरकार पाडले होते, तेव्हाही काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता कमलनाथजींच्या पाठीशी उभा राहिला. त्यामुळे या बातम्या निराधार आहेत. ज्यांच्या नेतृत्वाखाली आपण काही महिन्यांपूर्वी निवडणूक लढवली ती व्यक्ती काँग्रेस सोडू शकते, याची कल्पनाही आपण स्वप्नातही करू शकत नाही.

follow us