अशोक चव्हाणांनंतर काँग्रेसला दुसरा मोठा धक्का : दिग्गज नेते ‘कमलनाथ’ भाजपच्या वाटेवर

अशोक चव्हाणांनंतर काँग्रेसला दुसरा मोठा धक्का : दिग्गज नेते ‘कमलनाथ’ भाजपच्या वाटेवर

मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी भाजपमध्ये (BJP) प्रवेश केल्यानंतर काँग्रेसला (Congress) दुसरा मोठा धक्का बसला आहे. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री आणि प्रदीर्घ काळापासूनचे काँग्रेसचे दिग्गज नेते कमलनाथ (Kamalnath) भाजपच्या वाटेवर आहेत. कमलनाथ आणि त्यांचे पुत्र, छिंदवाड्याचे खासदार नकुल नाथ यांच्या एक्स, Facebook अशा सोशल मीडिया अकाऊंट्सवरून काँग्रेसचा लोगो गायब झाला आहे. त्यामुळे दोघे कधीही भाजपमध्ये प्रवेश करणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे. (long-time veteran Congress leader Kamal Nath will join the BJP)

77 वर्षीय कमलनाथ हे मागील सहा दशकांपासून काँग्रेससोबत आहेत. ते तब्बल नऊवेळा लोकसभेवर खासदार म्हणून निवडून गेले होते. याशिवाय जवळपास 16 वर्षे केंद्रात विविध खात्याचे मंत्री म्हणून काम केले आहे. 2018 मध्ये मध्य प्रदेशचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यावेळी काँग्रेस सरकार सत्तेत आल्यानंतर त्यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाची धुराही देण्यात आली होती. मात्र ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या बंडानंतर त्यांना राजीनामा द्यावा लागला होता.

अजितदादांची जहरी टीका : पण आता त्यांच्या नाकावर टिच्चून सुप्रियाताई स्वीकारणार संसद महारत्न पुरस्कार

काही दिवसांपूर्वी पार पडलेली मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक कमलनाथ यांच्या नेतृत्वात काँग्रेसने लढवली होती. मात्र यात काँग्रेसचा मोठा पराभव झाला. भाजपने दोन तृतीयांश जागा जिंकत सत्ता स्थापन केली. त्यावेळी या पराभवाचे खापर कमलनाथ यांच्यावर फोडत त्यांचा प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा घेण्यात आाला होता. तेव्हापासूनच ते नाराज असल्याच्या चर्चा होत्या. मात्र ते पक्ष सोडतील असा अंदाज कोणत्याही काँग्रेस नेत्याने व्यक्त केला नव्हता.

‘ईडी’चे सहा समन्स! अखेर केजरीवालांची ऑनलाइन हजेरी; म्हणाले, पुढील वेळी स्वतः येईल

अशात आता कमलनाथ आणि त्यांचे खासदार पुत्र नकुल नाथ यांच्या एक्स, Facebook अशा सोशल मीडिया अकाऊंट्सवरून काँग्रेसचा लोगो गायब झाला आहे. यासोबत छिंदवाडा येथील त्यांचा नियोजित कार्यक्रम रद्द करून अचानक दिल्ली दौरा जाहीर झाला आहे. त्यामुळे त्यांच्या भाजप प्रवेशावर शिक्कामोर्तब झाल्याचे सांगण्यात येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीत सुरू असलेल्या भाजपच्या अधिवेशनानंतर त्यांचा भाजपमध्ये प्रवेश होण्याची शक्यता आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube