Digvijay Singh : कॉंग्रेसचे संघटन कमकुवत म्हणून…..; दिग्विजय सिंह यांनी सुनावले खडेबोल

Digvijay Singh : कॉंग्रेसचे संघटन कमकुवत म्हणून…..; दिग्विजय सिंह यांनी सुनावले खडेबोल

‘Congress organization is weak, so people don’t vote’ : पुढील वर्षात लोकसभा निवडणुक (Lok Sabha Elections) आणि अनेक राज्यांच्या विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यासाठी सर्वच पक्षांनी जोरदार कंबर कसली आहे. कॉंग्रेसनेही (Congress) जोरदार तयारी केली आहे. रसातळाला गेलेल्या कॉंग्रेसला राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून उभारी दिली आणि कॉंग्रेसला पुनरुज्जीवीत केले आहे. दरम्यान, आता मध्य प्रदेशमध्ये काही महिन्यात विधानसभा निवडणुका (Assembly elections in Madhya Pradesh) होणार आहेत. त्याआधीच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह (Digvijay Singh) यांनी पक्षाच्या हायकमांडला आरसा दाखवत जोरदार टीका केली आहे. काँग्रेसचे संघटन कमकुवत असल्याचे सांगत पक्षाचे कान उघाडणी केली आहे. मतदानाच्या दिवशीही काँग्रेसचे निवडणूक व्यवस्थापन कमकुवत असते, अशं सिंह म्हणाले.

सिहोर येथे पत्रकारांशी संवाद साधताना दिग्विजय सिंह म्हणाले की, आमचा काँग्रेस पक्षाचे संघटन जसे असायला हवे, तसे नाही. हे मान्य करायला आम्हाला काहीच हरकत नाही. मतदानाच्या दिवशीही पक्षाच्या व्यवस्थापनात फार मोठी कमतरता अशते. ज्या प्रकारची तयारी करायला हवी, तशी तयारी केली जात नाही, मतदारांना कॉंग्रेसला मतदान करायचे असते. पण, पक्ष संघटनेच्या कमकुवतपणामुळं ते करू शकत नाहीत, असे दिग्विजय सिंह म्हणाले.

मोदी मुंबईत आल्यानं काहींना पोटदुखी…शिंदेचा विरोधकांवर हल्लाबोल

मध्य प्रदेशमध्ये काही महिन्यांत विधानसभा निवडणुका होणार आहेत. दिग्विजय सिंह 2018 च्या विधानसभा निवडणुकीत ज्या जागांवर पक्षाचा पराभव झाला, त्या जागांवर सतत भेटी देत ​​आहेत. आणि या जागांवर पक्षाचा दावा मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे. दिग्विजय सिंह यांनी काँग्रेसच्या अशा 66 पराभूत झालेल्या जागांची यादी तयार केली आहे.

माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांचे कौतुक करताना दिग्विजय सिंह म्हणाले की, त्यांनी संपूर्ण राज्यातील विधानसभेच्या जागा सेक्टर आणि मंडलांमध्ये विभागल्या आहेत. एका मंडळात 10 ते 15 मतदान केंद्रे असतील, तर एका सेक्टरमध्ये 3 ते 5 मतदान केंद्रे असतील.

दिग्विजय सिंह म्हणाले की, राज्यभरातील अशा विधानसभा मतदारसंघांच्या गमावलेल्या जागांना भेटी देऊन अहवाल तयार करून कमलनाथ यांच्याकडे सुपूर्द केला जाईल. यानंतर पक्षाची नवीन रणनीती आखली जाईल, असं ते म्हणाले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube