Congress Open Support to CJP Protest; Rahul Gandhi Stages Sit-in Outside PM Modi’s Residence : जंतर मंतरवर 20 जुलै रोजी विद्यार्थी आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जनंतर दिल्लीतील राजकीय वातावरण अधिकच तापले आहे. या घटनेच्या निषेधार्थ आणि कॉक्रोच जनता पार्टी (CJP)च्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवत लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिल्लीतील अधिकृत निवासस्थानाबाहेर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. राहुल गांधी यांच्यासोबत काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी, पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे तसेच काँग्रेसचे अनेक खासदार उपस्थित आहेत.
एमडी परीक्षेत मुलीचे दोन गुण वाढविले; महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची थेट खुर्ची गेली
दरम्यान, पोलिसांनी पंतप्रधान निवासस्थानाबाहेर आंदोलन करणाऱ्या काँग्रेसच्या अनेक खासदारांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे राजधानीत राजकीय संघर्ष अधिक तीव्र झाल्याचे चित्र आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था कडक केली असून परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
PM मोदी ‘लेम डक’ पोझिशनमध्ये; दिल्लीतील आंदोलनावरून राज ठाकरेंचे ताशेरे
दुसरीकडे, जंतर मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनस्थळी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी भेट देत आंदोलनकर्त्यांची विचारपूस केली. त्यांनी आंदोलनाचे नेतृत्व करणारे अभिजीत दिपके यांची भेट घेतली आणि विद्यार्थ्यांच्या मागण्या तसेच आंदोलनाची सद्यस्थिती जाणून घेतली. आंदोलकांशी संवाद साधत त्यांनी त्यांच्या भूमिका आणि मागण्यांबाबत माहिती घेतल्याचे सांगितले जात आहे.
Video : जमाव आमच्यावर हल्ला करेल या भीतीने आम्ही घाबरलो होतो : कंगना रणौत
नीट पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर सुरू झालेल्या या आंदोलनाने आता व्यापक राजकीय स्वरूप धारण केले आहे. आंदोलकांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याबरोबरच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही नैतिक जबाबदारी स्वीकारून पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे. सरकारने विद्यार्थ्यांवरील कारवाईची न्यायालयीन चौकशी करावी आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशीही आंदोलकांची भूमिका आहे.
जंतर मंतरवरील लाठीचार्जनंतर विरोधकांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. विद्यार्थ्यांचा आवाज दडपण्यासाठी बळाचा वापर केल्याचा आरोप करत विरोधी पक्षांनी सरकारला लक्ष्य केले आहे. दुसरीकडे, सरकारकडून या आंदोलनाबाबत आणि विरोधकांच्या आरोपांबाबत अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. राजधानी दिल्लीतील या घडामोडींमुळे आंदोलनाला राष्ट्रीय पातळीवर अधिक राजकीय पाठबळ मिळत असून, पुढील काही दिवसांत या प्रकरणावर केंद्र सरकार आणि विरोधक यांच्यातील संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
