Mallikarjun Kharge News : खाया पिया कुछ नही, गिलास तोडा बारह आना, या शब्दांत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी आपल्यावरील आरोप फेटाळले आहेत. संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान, ससंदेच्या पायऱ्यांवर भाजप खासदार प्रताप चंद्र सारंगी (Pratap Chandra Sarangi) यांनी काँग्रेस खासदारांसह राहुल गांधी यांनी धक्काबुक्की केल्याचा आरोप केलायं. या आरोपांनंतर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी घटनेतील खरी परिस्थिती पत्रकार परिषदेत सांगितलीयं.
मल्लिकार्जून खर्गे म्हणाले, देशभरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुद्द्यावरुन आंदोलन केली जात आहेत. आम्ही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून निघालो तेव्हा शांत पद्धतीने एका रांगेत चाललो होतो पण त्यांना काय सुचलं माहिती नाही. आम्ही येत असताना त्यांनी दरवाजात रोखण्याचा प्रयत्न केला. संसदेच्या अधिवेशनाचा वेळ संपत होता पण त्यांनी आम्हाला थांबवलं, त्यांनी त्यांची ताकद दाखवण्यासाठी सर्वच खासदारांना बोलवून घेतलं. काँग्रेसच्या महिला खासदारांनाही रोखण्यात आलं. आमच्यावर हल्ला करुन आम्हाला थांबवण्यात आलंय, कोणाला धक्का देण्याच्या स्थितीत आम्ही नव्हतो. उलट मलाच त्यांनी धक्का दिला तेव्हा मी खाली बसलो असल्याचं मल्लिकार्जून खर्गे यांनी स्पष्ट केलंय.
कांदा निर्यात शुल्क तातडीने रद्द करा; अजित पवारांचे वाणिज्य मंत्र्यांना पत्र
तसेच या घटनेनंतर आता सत्ताधाऱ्यांकडून आमच्यावर आरोप केले जात आहेत. प्रियंका गांधी यांनी या आंदोलनाचं नेतृत्व केलं. हे लोकं आमची चेष्टा करीत होते, आमच्यात फक्त महिला खासदार होत्या, ते सर्व पुरुष धक्का देत होते, अशी परिस्थिती भाजपवाल्यांनी केली होती, असा गंभीर आरोपही खर्गे यांनी यावेळी केलायं. तसेच आम्ही रोज आधीपासूनच संसदेत गोंधळ होऊ नये, संसदेच्या मुद्द्यांचं चिंतन करण्याचा आमचा प्रयत्न असतो.
गोंधळ करण्याचा प्रयत्नही आम्ही केला नाही. 14 दिवस आम्ही अधिवेशन चालवण्यासाठी आम्ही दररोज संसदेत येत होतो. अदानी भारताला लुटताहेत हे लोकं त्यांना लुटून देत आहेत हा आमचा मुद्दा होता. संविधानाची चर्चा आली तेव्हा त्यावेळी शाहांना कोणी सांगितलं की माहिती नाही, त्यांनी देवाची व्याख्या वेगळी केली. आंबेडकरांबाबत जो कोणी बोलत असेल तर त्यावरुन अमित शाहा यांनी आंबेडकरांची चेष्टा केली असल्याचंही खर्गे म्हणाले आहेत.
दरम्यान, संसदेच्या हिवाळी अधिवेशनात वातावरण तापलं आहे कारण गुरुवारी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर भाजपाचे खासदार प्रताप चंद्र सारंगी यांना धक्का देऊन पाडल्याचा आरोप झाला आहे. मला राहुल गांधींनी धक्का दिला त्यामुळे मला जखम झाली आणि डोक्याला मार लागला असं प्रताप चंद्र सारंगी यांनी म्हटलं आहे.