Congress Rajyasabha Candidate Abhishek Singhvi declared Assets approximately 2558 crore : राज्यसभेच्या 37 जागांसाठी निवडणूक प्रक्रिया लवकरच होणार आहे. (Rajysabha) 10 राज्यांमधील 37 जागांसाठी ही निवडणूक प्रक्रिया राबवली जात आहे. यामध्ये काँग्रेसने वरिष्ठ वकिल अभिषेक मनु सिंघवी यांना तेलंगाना राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी दिली आहे. सिंघवी यांनी जेव्हा उमेदवारी अर्ज दाखल केला. तेव्हा त्यांनी त्यामध्ये त्यांच्या संपत्तीचा उल्लेख केला आहे. हा आकडा पाहून सिंघवी हे चर्चेत आले आहेत.
Summer Tips : उन्हाळ्यात झपाट्याने वाढतयं वीज बिल? फक्त 5 ट्रिक्स ज्यामुळे लागेल ‘ब्रेक’
बार अँड बेंच असोसिएशनच्या अहवालानुसार सिंघवी यांनी त्यांच्या प्रतिज्ञा पत्रामध्ये त्यांचे उत्पन्न, कर्ज आणि इतर गुंतवणुकीबाबत सविस्तर माहिती दिली आहे. त्यानुसार त्यांच्या संपूर्ण एकत्र कुटुंबाचे उत्पन्न 2 हजार 558 कोटी रुपये एवढं आहे. ज्यामध्ये आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये 374 कोटीहून अधिक त्या अगोदर 2023-24 मध्ये 333 कोटी, 2022-23 मध्ये 359 कोटी, 2021-22 मध्ये 290 कोटी, आणि वर 2020-21 मध्ये 158 कोटी रुपये अधिक होतं. अशाप्रकारे त्यांच्या गेल्या पाच वर्षातील उत्पन्नाचा आलेख आहे. ज्यानुसार त्यांचे सरासरासी वार्षिक उत्पन्न हे 300 कोटी आहे.
पत्नीकडे 150 कोटींचे दागिने…
प्रतिज्ञा पत्रानुसार सिंघवी आणि त्यांच्या परिवाराची स्थावर आणि जंगम मालमत्ता सविस्तर दाखवण्यात आली आहे. ज्यामध्ये बँक डिपॉझिट्स, शेअर्स आणि म्युच्युअल फंड गुंतवणूक, कर्ज आणि ॲडव्हान्स, गाड्या, दागिने आणि इतर मौल्यवान वस्तूंचा समावेश आहे, या कागदपत्रांनुसार सिंघवी यांच्याकडे 2.40 कोटींचे तर त्यांच्या पत्नीकडे 157.53 कोटींचे दागिने आहेत. त्याचबरोबर सिंघवींकडे 25 कोटींहून अधिक किंमतींच्या पेंटिंग आणि आर्ट वर्क आहेत.
352 कोटीचे वैयक्तिक कर्ज…
वरील संपत्तीसह सिंघवी यांच्या प्रतिज्ञापत्रामध्ये स्थावर मालमत्तेच्या रूपामध्ये नव्या दिल्लीमध्ये ते राहत असलेल्या घराचा उल्लेख आहे. जे सिंघवी आणि त्यांच्या पत्नीच्या नावे आहेत. यामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक गुंतवणूक आणि इतर संपत्तीचा हे उल्लेख आहे. तर कर्जाबद्दल सांगायचं झालं तर सिंघवी यांनी जवळपास 353.32 कोटी रुपयांचं वैयक्तिक कर्ज घेतलेलं आहे. त्यांच्या पत्नीने देखील विविध कंपन्यांकडून जवळपास 72.99 कोटी रुपयांचा कर्ज घेतलं आहे.
भाजपची ‘पॉलिटिकल ड्रायक्लिनिंग’ की गुन्हेगारांचे अभयदान? अंबादास दानवे भडकले; कारण काय?
तर इंटरेस्टिंग गोष्ट ही आहे की, सिंघवी यांच्या प्रतिज्ञा पत्रामध्ये इतर फिक्स अॅसेट्सच्या स्वरूपात घर आणि ऑफिसमध्ये वापरले जाणारे सामान याची देखील विस्तृत माहिती देण्यात आली आहे. यामध्ये एसी फर्निचर किचन अप्लायन्सेस कम्प्युटर आणि इतर उपकरण यांचा समावेश आहे. ज्यात एका कम्प्युटरची किंमत 163 रुपये दाखवण्यात आली आहे. तसेच यांच्यावर 63 कोटी रुपयांवरून अधिकच्या आयकर देखील आहे.
