Download App

काँग्रेसलाही लाडकी बहीण योजनेची भूरळ, देणार 3000 रुपये, जाहीरनाम्यात केली मोठी घोषणा

Congress Manifesto : संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या जम्मू आणि काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी (Jammu and Kashmir Assembly

  • Written By: Last Updated:

Congress Manifesto : संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या जम्मू आणि काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी (Jammu and Kashmir Assembly Elections) काँग्रेसने (Congress) आज आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा तसेच घराच्या प्रमुखाला दरमहा 3000 रुपये देणार असल्याची माहिती काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात दिली आहे.  मात्र या जाहीरनाम्यात काँग्रेसने कलम 370 चा उल्लेख केलेला नाही.

काँग्रेस पक्षाचा हा जाहीरनामा जनतेच्या मागणीच्या आधारे तयार करण्यात आला असल्याची माहिती जम्मू-काश्मीर काँग्रेसचे अध्यक्ष तारिक हमीद कारा (Tariq Hameed Karra) यांनी दिली. यावेळी पवन खेडा आणि जम्मू-काश्मीरचे अन्य नेते उपस्थित होते.

यावेळी तारिक हमीद करा म्हणाले, काँग्रेस पक्षाचा हा जाहीरनामा प्रत्यक्षात जनतेचा जाहीरनामा आहे. 22 जिल्ह्यांतील समित्यांच्या माध्यमातून, आम्ही समाजातील विविध घटकांशी संपर्क साधून हा जाहीरनामा तयार केला आहे. असं माध्यमांशी बोलताना तारिक हमीद करा म्हणाले. तर दुसरीकडे यावेळी काँग्रेस नेते पवन खेडा (Pawan Khera) यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.

यावेळी पवन खेडा म्हणाले की, गेल्या 10 वर्षात काश्मीरमध्ये कोणताही विकास झाला नाही. जम्मू-काश्मीरमध्ये आणि दिल्लीत गेल्या 10 वर्षांपासून एक सरकार आहे मात्र या सरकारला जनतेचा आवाज ऐकू येत नाही. आमच्या टीमने 22 जिल्ह्यांमध्ये जाऊन जनतेशी चर्चा करून जाहीरनामा तयार केला आहे. असं यावेळी पवनखेडा म्हणाले.

जम्मू-काश्मीरसाठी काँग्रेसची हमी

जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा देणार

घराच्या प्रमुखाला दरमहा 3000 रुपये देणार

बचत गटांसाठी 5 लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज

प्रत्येक कुटुंबासाठी 25 लाखांपर्यंतचा आरोग्य विमा

30 मिनिटांत परवडणारी आरोग्य सेवा

प्रत्येक तहसीलमध्ये रुग्णवाहिकेसह सुसज्ज फिरता दवाखाना

प्रत्येक जिल्ह्यात सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल

काश्मिरी पंडितांच्या पुनर्वसनासाठी मनमोहन सिंग यांनी आखलेली योजना पूर्णत: अंमलात आणली जाईल

1 लाख रिक्त नोकऱ्या भरणार

मोठी बातमी! राहुल गांधींवर वादग्रस्त विधान करणाऱ्या आमदार संजय गायकवाडांवर गुन्हा दाखल

कुटुंबातील प्रत्येक सदस्याला 11 किलो रेशन देणार

follow us