Jammu and Kashmir Assembly Election : भाजपकडून जम्मू-काश्मीरसाठी 44 उमेदवारांची यादी जाहीर

Jammu and Kashmir Assembly Election : भाजपकडून जम्मू-काश्मीरसाठी 44 उमेदवारांची यादी जाहीर

BJP announced candidates Jammu and Kashmir Assembly Election :  जम्मू आणि काश्मीरच्या विधानसभा निवडणुका तीन टप्प्यांमध्ये होत आहेत. (Jammu and Kashmi ) यासाठी भाजपकडून ४४ जागांसाठी उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे.

तीन टप्प्यात निवडणूक

जम्मू- काश्मीरमध्ये पाच वर्षानंतर विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमिवर सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरु केली आहे. दरम्यान, जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत पहिल्या टप्प्यासाठी १५, दुसऱ्या टप्प्यासाठी १० आणि तिसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी १९ उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली आहेत.

माजी विधानसभा अध्यक्षांना उमेदवारी नाही

माजी उपमुख्यमंत्री आणि जम्मू-काश्मीर विधानसभेचे माजी अध्यक्ष डॉ. निर्मल सिंह यांना भाजपाकडून उमेदवारी देण्यात आलेली नाही. २०१४ मध्ये बिलवार विधानसभा मतदारसंघातून निर्मल सिंह विजयी झाले होते. तसंच, या यादीत काश्मीर खोऱ्यातील दोन जागांवर भाजपने काश्मिरी पंडित यांना उमेदवारी दिली आहे. वीर सराफ यांना शांगस-अनंतनाग पूर्व आणि अशोक भट्ट यांना हब्बाकडलमधून उमेदवारी देण्यात आली आहे.

निवडणूक जाहीर होताच माजी मुख्यमंत्र्याचे आश्वासन; जम्मू काश्‍मीरमधील 370 बाबत केला हा दावा

निवडणुकीची रणनीती ठरली

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीसंदर्भात नवी दिल्लीत भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक झाली. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेते सहभागी झाले होते. या बैठकीत निवडणुकीची रणनीती, मुद्दे, उमेदवारांची नावं आणि नरेंद्र मोदींच्या राज्यातील संभाव्य सभा यांवर चर्चा करण्यात आल्याचं सांगण्यात आलं. तसंच, या बैठकीनंतर आज भाजपकडून जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे.

 

https://twitter.com/ANI/status/1827930303970648281

follow us
  • fb
  • instagram
  • youtube