निवडणूक जाहीर होताच माजी मुख्यमंत्र्याचे आश्वासन; जम्मू काश्मीरमधील ‘370’ बाबत केला ‘हा’ दावा
Cancelling Article 370 : नॅशनल कॉन्फरन्स पक्षाने जम्मू काश्मीरमधील (Article 370) आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. जम्मू-काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा मिळवून देण्याबरोबरच केंद्र सरकारने रद्द केलेले 370 वे कलम पुन्हा लागू करण्याचे आश्वासन या जाहीरनाम्यात देण्यात आलं आहे.
मोठी बातमी! CPI(M) सरचिटणीस सीताराम येचुरी यांची तब्येत बिघडली, एम्समध्ये दाखल
नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी आज पत्रकार परिषदेत निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध केला. या जाहीरनाम्याद्वारे जनतेला 12 आश्वासने देण्यात आली आहेत. जम्मू काश्मीरला पूर्ण राज्याचा मिळवून देत 24 वर्षांपूर्वी येथील विधानसभेने स्वायत्ततेबाबत मंजूर केलेल्या ठरावाची अंमलबजावणी करण्याचं आश्वासन देण्यात आलं आहे.
विशेष दर्जा देणारे कलम 370 देखील पुन्हा लागू करण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचं अब्दुल्ला यांनी सांगितलं. आम्ही फक्त अंमलबजावणी योग्य आश्वासनेच दिली असल्याचा दावा त्यांनी केला. तसंच, हा जाहीरनामा म्हणजे आमच्या पक्षाचे व्हीजन डॉक्युमेंट असल्याचंही अब्दुल्ला यांनी यावेळी सांगितलं.
मोठी बातमी : अखेर जम्मू-कश्मीरमध्ये विधानसभा निवडणुका होणार : POK सहीत विधानसभेची पुनर्स्थापना
जम्मू काश्मीरला 1953 पूर्वी जो घटनात्मक दर्जा होता, तो परत मिळावा अशी मागणी करणारा ठराव येथील विधानसभेने 2000 साली मंजूर केला होता. त्यावेळी फारुख अब्दुल्ला राज्याचे मुख्यमंत्री होते. तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने हा ठराव फेटाळून लावला होता.