Congress Support TVK : तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत टीव्हीकेने सर्वांना धक्का देत 108 जागांवर बाजी मारली आहे. या निवडणुकीत 108 जागा जिंकून देखील टीव्हीके बहुमतापासून दुर आहे. टीव्हीकेला सरकार स्थापन करण्यासाठी आणखी 10 आमदारांची गरज आहे. सरकार स्थापन करण्यासाठी आणखी 10 आमदारांची गरज असल्याने टीव्हीके प्रमुख थलपती विजय काय निर्णय घेणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे. तर दुसरीकडे आता एक मोठी बातमी समोर येत आहे. या बातमीनुसार, काँग्रेस सरकार स्थापन करण्यासाठी टीव्हीकेला पाठिंबा देणार आहे. याबाबत मंगळवारी रात्री उशिरा झालेल्या बैठकीत तामिळनाडू काँग्रेसकडून निर्णय घेण्यात आला आहे.
तामिळनाडू काँग्रेसचे प्रभारी गिरीश चोडणकर यांनी टीव्हीकेला पाठिंबा देण्याच्या मुद्यावर चर्चा करण्यासाठी बैठक बोलावली होती. या बैठकीदरम्यान विजय यांच्या टीव्हीकेला पाठिंबा देण्याच्या बाजूने निर्णय झाला असल्याची माहिती समोर आली आहे. काँग्रेसच्या PAC ने निर्णय घेतला माहितीनुसार, तामिळनाडूत एक धर्मनिरपेक्ष सरकार स्थापन करण्याच्या उद्देशाने, तामिळनाडू काँग्रेसच्या राजकीय व्यवहार समितीने (PAC) टीव्हीके नेते विजय यांना पाठिंबा देण्याचा निर्णय एकमताने घेतला आहे.
काँग्रेस पक्षातील इतर नेत्यांच्या मते, विधानसभा निवडणुका द्रमुकसोबत (DMK) युती करून लढल्या गेल्या होत्या हे खरे असले, तरी हे पाऊल या दक्षिण भारतीय राज्यात एक धर्मनिरपेक्ष सरकार सुनिश्चित करण्यासाठी उचलण्यात आले आहे आणि त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे, भाजप आणि त्यांच्या अप्रत्यक्ष समर्थकांना (proxies) कोणत्याही परिस्थितीत तामिळनाडूवर सत्ता गाजवण्यापासून रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
तर दुसरीकडे काँग्रेस पक्षाच्या शीर्ष नेत्यांनी मंगळवारी संध्याकाळी पक्षाचे प्रमुख मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निवासस्थानी एक बैठक घेतली. या बैठकीला लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि तामिळनाडूचे प्रभारी गिरीश चोडणकर यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना, काँग्रेसचे सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल म्हणाले की, पक्षाच्या नेतृत्वाने या दक्षिण भारतीय राज्यातील निवडणुकीनंतरच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा केली. टीव्हीकेचे अध्यक्ष विजय यांनी तामिळनाडूमध्ये सरकार स्थापन करण्यासाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडे पाठिंब्याची विनंती केली आहे. या संदर्भात INC ची भूमिका स्पष्ट आहे. तामिळनाडूचा जनादेश हा एका धर्मनिरपेक्ष सरकारसाठी आहे असे सरकार जे संविधानाचा मूळ गाभा जपण्यास आणि त्याच्या प्रत्येक पैलूचे रक्षण करण्यास कटिबद्ध असेल. कोणत्याही परिस्थितीत, भाजपला किंवा त्यांच्या प्रतिनिधींना तामिळनाडूवर सत्ता गाजवण्याची संधी दिली जाणार नाही, या आपल्या निर्धारावर INC ठाम आहे.”
वेणुगोपाल यांनी पुढे सांगितले की, काँग्रेसच्या नेतृत्वाने TNCC ला विजय यांच्या विनंतीबाबत अंतिम निर्णय घेण्याचे निर्देश दिले आहेत हा निर्णय घेताना, निवडणुकीच्या निकालांतून प्रतिबिंबित झालेली राज्यातील जनतेची भावना योग्य प्रकारे विचारात घेतली जाईल, याची खात्री करण्यासही सांगण्यात आले आहे.
नेमकं चाललंय काय? पुण्यात 9 वर्षीय चिमुकलीवर अत्याचाराचा प्रयत्न; आरोपी पोलिसांच्या ताब्यात
काँग्रेसचा पाच जागांवर विजय
काँग्रेस पक्षाने पाच जागांवर विजय मिळवला आहे, तर पट्टाली मक्कल काची (PMK) ने चार जागा पटकावल्या आहेत. CPI आणि CPI(M) या दोन्ही पक्षांनी प्रत्येकी दोन जागा जिंकल्या आहेत. सत्ताधारी द्रविड मुन्नेत्र कळघम (DMK) पक्षाने 59 जागा जिंकल्या, तर अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम (AIADMK) ने 47 जागा मिळवल्या. भारतीय जनता पक्षाला (BJP) केवळ एका जागेवर विजय मिळवता आला. तर देसिया मुरपोक्कू द्रविड कळघम (DMDK) आणि अम्मा मक्कल मुन्नेत्र कळघम (AMMK) या पक्षांनी प्रत्येकी एक जागा जिंकली, तर VCK ने दोन जागा पटकावल्या. काँग्रेसने DMK सोबत निवडणूकपूर्व आघाडी करून विधानसभा निवडणुका लढवल्या होत्या, तर भाजपने AIADMK सोबत आघाडी केली होती.
