विजयने सत्तेचे गणित जुळवलं; काँग्रेस, डाव्यांबरोबर डील फायनल ? कोणाला किती मंत्रिपदे मिळणार ?

Vijay-234 सदस्यांच्या विधानसभा निवडणुकीत TVK ला बहुमतासाठी 118 आमदारांची आवश्यकता होती. परंतु ही मॅझिक फिगर टीव्हीकेला गाठता आलेली नाही.

TVK

Vijay’s TVK moves to build coalition in Tamil Nadu; Congress may get 2 Cabinet berths: तमिळनाडूमध्ये अभिनेता विजय याच्या टीव्हीके पक्षाने सत्ताधारी डीएमके पक्षाला सत्तेतून खाली खेचले आहे. विजय यांच्या पक्षाने सर्वाधिक 108 जागा जिंकल्या आहेत. परंतु सत्ता स्थापनेसाठी मात्र बहुमत मिळालेले नाही. त्यामुळे छोट्या पक्षांची मदत विजयला घ्यावी लागणार आहे. आता तसे समीकरण जुळवण्यासाठी विजयने तयारी सुरू केली आहे.

डीएमके आणि एआयएडीएमके या पक्षांचे सरकार या राज्यात उलटून पालटून येत होते. परंतु दोन्ही पक्षांना स्पष्ट बहुमत मिळत होते. त्यामुळे आघाडी करून सरकार स्थापनेची आवश्यकता नव्हती. परंतु आता दहा जागा कमी पडल्याने विजय यांना आघाडीचे सरकार स्थापन करावे लागणार आहे.

234 सदस्यांच्या विधानसभा निवडणुकीत TVK ला बहुमतासाठी 118 आमदारांची आवश्यकता होती. परंतु ही मॅझिक फिगर टीव्हीकेला गाठता आलेली नाही. त्यामुळे सत्ता स्थापन करण्यासाठी आघाडीचे समीकरण जुळविण्यास सुरुवात झाली आहे. मंगळवारी सकाळी विजय यांनी पक्ष कार्यालयाला भेट देऊन नव्याने निवडून आलेल्या आमदारांची बैठक घेतली. यावेळी संभाव्य आघाडीबाबत चर्चा झाल्याचे समोर येत आहे.


काँग्रेस व डाव्या पक्षांचा पाठिंबा

डीएमके आणि एआयएडीएमकेबरोबर कोणत्याही पक्षाबरोबर विजय जाणार नाही. त्याएेवजी कमी जागा असलेल्या पक्षांबरोबर जाण्याचा निर्णय जाहीर झाला आहे. विजय हे दोन जागांवर निवडून आलेले आहेत. त्यामुळे त्यांना एका जागेचा राजीनामा द्यावा लागणार आहे. त्यामुळे टीव्हीकेकडे 107 जागा आहेत. त्यामुळे बहुमतासाठी 11 आमदारबरोबर हवे आहेत. त्यात काँग्रेसचे पाच आणदार, व्हीसीके म्हणजे विदुथलाई चिरुथैगल कत्चीचे 2, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे 2 आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे (मार्क्सवादी) 2 आमदार मिळाल्यास 11 आमदारांचा गट मिळून टीव्हीकेचे बहुमत होणार आहे. हे पक्ष डीएमकेबरोबर आघाडीत आहेत. परंतु ते आघाडीतून बाहेर पडून टीव्हीकेला पाठिंबा देणार असल्याचे बोलले जात आहे.


विजय इंडिया आघाडीत येणार का ?

डीएमकेतून काँग्रेस बाहेर पडल्यास इंडिया आघाडीचा काय असा प्रश्न निर्माण होता. या परिस्थिती टीव्हीकेला इंडिया आघाडीमध्ये घेतले जाऊ शकते. कारण टीव्हीकेला विजय यांना धर्मनिरपेक्ष व्यक्ती म्हणून मतदारांनी निवडले आहे.


काँग्रेसला दोन मंत्रिपदे?

या सरकारमध्ये इतर पक्षांना सहा मंत्रिपदे दिली जाण्याची शक्यता आहे. काँग्रेसला दोन कॅबिनेट मंत्रिपदे मिळू शकतात. तर इतर छोट्या पक्षांना चार ते पाच मंत्रिपदे मिळू शकतात.

follow us