karnatak asembly election update 2023 : कर्नाटकात मतमोजणी सुरू आहे. सुरुवातीच्या कलानुसार काँग्रेसला (Congress) स्पष्ट बहुमत मिळताना दिसत आहे. निवडणुकीच्या ट्रेंडमध्ये काँग्रेसने बहुमताचा आकडा पार केला आहे. तर भाजप (BJP) दुसऱ्या तर जेडीएस तिसऱ्या क्रमांकावर आहे. या निवडणुकीत काँग्रेसला 132 जागा मिळाल्या आहेत. निकालाने खूश झालेल्या कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केला आहे. दरम्यान, कर्नाटक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी. के शिवकुमार (D. K Shivakumar) यांनी आपली प्रतिक्रिया दिली. राज्यातील कॉंग्रेसचा विजय पाहून त्यांना आनंदाश्रू अनावर झाले. आम्ही कर्नाटकच्या लोकांच्या अपेक्षा पूर्ण करू, असं त्यांनी सांगितलं.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे निकाल समोर येत आहेत. सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणी सुरू आहे. ट्रेंडमध्ये काँग्रेसला बहुमत मिळताना दिसत आहे. पक्ष 130 हून अधिक जागांवर पुढे आहे. तर भाजप 66 जागांवर आघाडीवर आहे. तर जेडीएस तिसऱ्या क्रमांकावर आहे.
डीके शिवकुमार भावूक झाले
ट्रेंडमध्ये काँग्रेसला प्रचंड बहुमत मिळाले आहे. या सगळ्यात कर्नाटकमधील काँग्रेसच्या प्रचाराचे नेतृत्व करत असलेले राज्य पक्षप्रमुख डीके शिवकुमार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ट्रेंडमध्ये काँग्रेसचा विजय पाहून काँग्रेसचे कर्नाटक अध्यक्ष डीके शिवकुमार भावूक झाले. ते म्हणाले, हा अखंड कर्नाटकचा विजय आहे. सोबतच या विजयाचे श्रेय आमच्यासाठी कष्ट करणाऱ्या कार्यकर्त्यांना जाते, असेही ते म्हणाले. सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी आम्हाला नेहमीच पाठिंबा दिला. त्यांचे योगदान आम्ही विसरू शकत नाही.
डीके शिवकुमार यांनी माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या तसेच सर्व नेत्यांचे आणि कार्यकर्त्यांचे आभार मानले आहेत. ते म्हणाले की, भारतातील जोडो यात्रेचे फलित झाले आहे. हायकमांडला विजयाची खात्री मी आधीच दिली होती. काँग्रेस कार्यकर्त्यांनी व नेत्यांनी परिश्रम घेतले. लोकांनी आमच्यावर विश्वास दाखवला, नेत्यांनी आम्हाला साथ दिली. सामूहिक नेतृत्वाचा हा परिणाम आहे. मी सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांना आश्वासन देतो की आम्ही कर्नाटकच्या लोकांच्या अपेक्षा पूर्ण करू.
त्यांनी सांगितले की, या भाजपवाल्यांनी मला तुरुंगात टाकले, तेव्हा सोनिया गांधी मला तुरुंगात भेटायला आल्या हे मी कधीच विसरू शकत नाही. मी तुरुंगात राहणे पसंत केले. हा माझ्यावर गांधी कुटुंबाचा, काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा विश्वास आहे.
#WATCH | Karnataka Congress President DK Shivakumar gets emotional on his party's comfortable victory in state Assembly elections pic.twitter.com/ANaqVMXgFr
— ANI (@ANI) May 13, 2023
कर्नाटकात काँग्रेसने बाजी मारली आहे. काँग्रेस नेते डीके शिवकुमार आमदारांना फोन करून संपर्कात आहेत. काँग्रेस पक्षाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उद्या दुपारी 12 वाजता आमदारांची बैठक बोलावण्यात आली आहे. यामध्ये मुख्यमंत्रिपदासाठीच्या नावाची घोषणा केली जाणार आहे. कर्नाटकात भाजपची सत्ता गमवावी लागत आहे. भाजपने आतापर्यंत 66 जागांवर आघाडी घेतली आहे. 224 जागांच्या कर्नाटक विधानसभेत बहुमतासाठी 113 जागा आवश्यक आहेत.
दरम्यान, उद्या काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावण्यात आली आहे. दुसरीकडे, ऑपरेशन लोटस टाळण्यासाठी काँग्रेस पूर्ण अलर्टवर आहे. दुसरीकडे भाजप नेते जेडीएस नेतृत्वाच्या संपर्कात आहेत. त्यामुळं कर्नाटकात कोणता पक्ष सत्तारुढ होतो, हेच पाहणं महत्वाचं आहे.