Karnataka Election : माजी मुख्यमंत्र्याच्या मुलाला अपक्षाने फोडला घाम; ‘या’ मतदारसंघात काट्याची टक्कर

Karnataka Election : माजी मुख्यमंत्र्याच्या मुलाला अपक्षाने फोडला घाम; ‘या’ मतदारसंघात काट्याची टक्कर

Karnataka Election Results : कर्नाटक निवडणुकीची मतमोजणी (Karnataka Election Results) सुरू आहे. काँग्रेसने (Congress) दमदार प्रदर्शन करत विजयाच्या दिशेने दमदार वाटचाल सुरू केली आहे. काही मतदारसंघात काट्याची टक्कर सुरू आहे. तर काही मतदारसंघ असे आहेत जिथे अपक्षांनी दिग्गज उमेदवारांना घाम फोडला आहे. असाच एक मतदारसंघ आहे शिकारीपुरा. येथे अपक्ष उमेदवार एस. पी. नागराजगौडा (S. P. Nagrajgowda) यांनी माजी मुख्यमंत्री बी. एस. येदियुरप्पा यांचे पुत्र विजयेंद्र (Vijayendra Yediyurappa) यांनी कडवी टक्कर दिली आहे.

या मतदारसंघाकडे राज्याचे लक्ष लागले आहे. या मतदारसंघात भाजपने (BJP) अगदी शेवटच्या टप्प्यात विजयेंद्र यांना उमेदवारी दिली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी विजयेंद्र यांची भेट घेतली होती. त्यानंतर येथे त्यांचा विजय निश्चित मानला जात होता. मात्र, सुरुवातीच्या टप्प्यात ते चार हजार मतांनी पिछाडीवर पडले होते.

Nana Patole : अजित पवार यांना माझी कॅपॅबिलीटी कळाली, त्यांनी चूक मान्य केली

या मतदारसंघात एकूण दहा उमेदवार आहेत. मात्र खरी लढत भाजप काँग्रेस नाही तर भाजप आणि अपक्ष उमेदवार नागाराजगौडा यांच्यात होत आहे. येथे काँग्रेस उमेदवार मालतेश गोणी यांना फक्त 4 हजार 961 मते मिळाली आहेत. आम आदमी पार्टीच्या चंद्रकांत रेवणकर यांना फक्त 193 मते मिळाली आहेत. दुसरीकडे अपक्ष उमेदवार नागराजगौडा यांनी तब्बल 45 हजार 449 मते मिळवली आहेत.

नागराजगौडा माजी मुख्यमंत्री येदियुरप्पा यांचे पुत्र विजयेंद्र यांना जोरदार टक्कर देत आहे. आतापर्यंतच्या मतमोजणीत विजयेंद्र येदियुरप्पा यांना 53 हजार 278 मते मिळाली आहेत. त्यांच्या मतांची टक्केवारी 49.21 इतकी आहे. सध्या ते आघाडीवर आहेत. मात्र अपक्ष उमेदवार नागराजगौडा (45499) यांच्या मतांचा विचार केला तर फरक जास्त नाही. त्यामुळे मतमोजणी होईपर्यंत येथे धाकधूक कायम राहणार असल्याचे दिसत आहे.

Karnatak Election 2023 : माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचे नातू निखिल कुमारस्वामी पिछाडीवर

यंदा विधानसभेत त्रिशंकू परिस्थिती राहिल असे अंदाज व्यक्त केले जात आहेत. त्यामुळे भाजपने दुसऱ्या प्लॅनवर काम करण्यास सुरुवात केली आहे. भाजप नेते जेडीएस नेत्यांशी संपर्क करत असल्याची माहिती आहे.

दुसरीकडे काँग्रेसही सतर्क असून कोणताही दगाफटका होऊ नये याची काळजी घेत आहे. काँग्रेसने आपल्या सर्व आमदारांना बंगळुरूला बोलावून घेतले आहे. घोडेबाजार टाळण्यासाठी या आमदारांना सुरक्षित स्थळी हलविण्यात येणार असल्याचेही समजते. यानंतर राज्याच्या राजकारणात वेगवान घडामोडी घडत आहेत. अजून पूर्ण निकाल हाती आलेले नाहीत. त्यामुळे चित्र अजून स्पष्ट नाही. मात्र सध्याच्या स्थितीवरून तरी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरत असल्याचे दिसून येत आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube