Download App

Rahul Gandhi : निवडणुकांपूर्वीच काँग्रेसकडून कर्नाटकात आश्वासनांची खैरात; 2 वर्षांसाठी देणार इतका बेरोजगारी भत्ता

  • Written By: Last Updated:

नवी दिल्ली : 2023 च्या कर्नाटक विधानसभा (Karnataka election) निवडणुकीतून काँग्रेसला मोठ्या आशा आहेत. यासाठी पक्ष जोरदार तयारी करत आहे. काँग्रेस निवडणुकीत कोणतीही कसर सोडू इच्छित नाही. याच अनुषंगाने काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी कर्नाटकसाठी मोठ्या घोषणा केल्या आहेत. कर्नाटक विधानसभा निवडणुकीसंदर्भात राहुल गांधी यांनी येथे पहिली सभा घेतली.

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी कर्नाटकसाठी केलेली सर्वात मोठी घोषणा म्हणजे दोन वर्षांसाठी बेरोजगार पदवीधरांना दरमहा 3,000 रुपये देण्याची. ते बेळगावमध्ये म्हणाले, “बेरोजगारी कमी करण्यासाठी केंद्र सरकार काहीही करत नाही. त्यामुळेच काँग्रेस पक्ष बेरोजगार पदवीधरांना दोन वर्षांसाठी दरमहा 3,000 रुपये आणि पदविकाधारकांना दोन वर्षांसाठी 1,500 रुपये प्रति महिना देणार आहे.”

पाण्यात पाप करणाऱ्यांना शिक्षा देणार का? बीडच्या आमदारांनी गुलाबरावांना घेरलं

राहुल गांधींनी कर्नाटकात 200 युनिट मोफत वीज देण्याची घोषणाही केली, दोन हजार युनिट वीज मोफत देण्याचे आश्वासन दिले. यासोबतच 10 लाख खासगी नोकऱ्या देण्याचे आणि 2.5 लाख रिक्त सरकारी पदे भरण्याचे आश्वासन राहुल गांधींनी दिले होते.

कर्नाटकातील बेळगाव येथे निवडणूक सभेला संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले, कर्नाटक सरकार हे देशातील सर्वात भ्रष्ट सरकार आहे. कोणतेही काम करण्यासाठी 40% कमिशन घेतले जाते. भाजप आमदाराबाबत त्यांनी भगवा पक्षावर हल्लाबोल केला. कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनने पंतप्रधानांना पत्र लिहिले पण त्यांनी काहीच केले नाही, असे राहुल म्हणाले. आमदार मुलाकडून आठ कोटी रुपये जप्त करण्यात आले मात्र कारवाई झाली नाही.

Tags

follow us