Opinion polls : तेलंगणा, मिझोराम, छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि राजस्थान या पाच राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांकडे आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वीची (Lok Sabha election) लिटमस टेस्ट म्हणून पाहिलं जातं. या राज्यांमध्ये होत असलेल्या निवडणुकीतून लोकसभा निवडणुकीचे वारे कुठल्या दिशेने वाहत आहेत, याचा अंदाज घेणार आहेत. दरम्यान, या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार यासंदर्भात एबीपी न्यूज-सी व्होटरच्या सर्वेक्षणात (C Voter Surveys) धक्कादायक दावा करण्यात आला.
World Cup 2023 : चारशे धावा करूनही न्यूझीलंड पराभूत, पाकिस्तान सेमीफायनलच्या रेसमध्ये
सध्या मध्य प्रदेशात भाजप, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेस, तेलंगणात भारत राष्ट्र समिती आणि मिझोराममध्ये मिझो नॅशनल फ्रंटची सत्ता आहे. मात्र, निवडणुकीपूर्वी शेवटच्या टप्प्यातील ओपिनियन पोलनुसार तेलंगणामध्ये चंद्रशेखर राव यांच्या बीआरएस, मिझोराममध्ये मिझो नॅशनल फ्रंट, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशमध्ये काँग्रेस आणि राजस्थानमध्ये भाजपचा विजय होईल, असा दावा केला जात आहे.
पाचपैकी दोन राज्यात काँग्रेसला तर एका राज्यात भाजपला आघाडी मिळतांना दिसत आहे. उर्वरित दोन राज्यात प्रादेशिक पक्ष विजयी होतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
या सर्वेक्षणानुसार, तेलंगणातील 119 जागांपैकी 49 ते 61 जागा बीआरएसच्या खात्यात जातील असा अंदाज आहे. तर काँग्रेसला 43 ते 55 जागा, भाजपला 5 ते 11 आणि इतरांच्या खात्यात 6 ते 8 जागा जातील असा अंदाज आहे.
40 विधानसभेच्या जागा असलेल्या मिझोरममध्ये, MNF ला 17 ते 21 जागा, ZPM 10 ते 14, काँग्रेस 6 ते 10 आणि इतरांना 0 ते 2 जागा मिळण्याची शक्यता आहे.
गेल्या 5 वर्षांपासून काँग्रेसची सत्ता असलेल्या छत्तीसगडमध्ये काँग्रेस पुन्हा एकदा विजयी होताना दिसत आहे. विधानसभेच्या 90 जागा असलेल्या छत्तीसगडमध्ये काँग्रेसला 45 ते 51 जागा, भाजपला 36 ते 42 जागा आणि इतरांना 2 ते 5 जागा मिळण्याची शक्यता आहे.
या पाच राज्यांपैकी सर्वात महत्त्वाचं राज्य असलेल्या मध्य प्रदेशमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये कांटे की टक्कर पाहायला मिळणणार आहे. मात्र, मध्यप्रदेशात भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.
या ओपिनियन पोलनुसार, 230 जागांच्या मध्य प्रदेश विधानसभेत काँग्रेसला 118 पैकी 130 जागांसह स्पष्ट बहुमत मिळण्याची शक्यता आहे. भाजपला 99 ते 111 जागांवर समाधान मानावे लागणार आहे. इतरांना 0 ते 2 जागा मिळण्याची शक्यता आहे.
राजस्थानमध्ये काँग्रेसची सत्ता उलथून टाकण्यात भाजपला येश मिळण्याची शक्यता आहे. 200 जागा असलेल्या राजस्थानमध्ये भाजपला 114 ते 124 जागा मिळण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत काँग्रेसला 67 ते 77 जागांवर समाधान मानावे लागू शकते. तर इतरांना 5 ते 13 जागा मिळू शकतात.