Snake Venom Case : सुप्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादव (Elvish Yadav) याला उत्तर प्रदेश पोलिसांकडून अटक करण्यात आली आहेत. विषारी सापांच्या विष प्रकरणी (Snake Venom Case) एल्विश यादवला पोलिसांकडून करण्यात आली आहे. सापांच्या विष प्रकरणी पोलिसांनी चौकशीला बोलावण्यात आल्यानंतर त्याला अटक केलीयं. एल्विशला अटक झाल्यानंतर न्यायालयाकडून त्याला दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे.
Lok Sabha Election : आता ‘वंचित’ आघाडीला नवा प्रस्ताव नाही; ‘मविआ’ नेत्यांचं बैठकीत एकमत?
नेमकं प्रकरण काय?
रेव्ह पार्टीमध्ये सापांच्या विषाची तस्करी प्रकरणी नोएडा पोलिसांकडून जयपुर इथल्या एफएसएल संस्थेकडे विषांचे नमुने पाठवले होते. यामध्ये कोबरा जातीच्या सापाचं विष असल्याचं समोर आलं होतं. या प्रकरणी युट्यूबर एल्विश यादववर सेक्टर 49 पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. एफएसएल या एसजीओ संस्थेमार्फत गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर या प्रकरणी संशयित गारुडींकडून सापांचे जहर जप्त करण्यात आलं होतं. त्यानंतर नमुन्यांची तपासणी करण्यात आली होती.
दहावी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी, नेव्हल डॉकयार्ड स्कूलमध्ये 301 रिक्त जागांसाठी भरती सुरू
ड्रग्ज पार्ट्यांमध्ये विषारी सापांचं विष पुरवल्याचा एल्विशवर आरोप आहे. एल्विशसह सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विषारी सापांच्या तस्करीचे एल्विशवर आरोप आहेत.एल्विश यादवचे दोन युट्यूब चॅनेल असून त्याने 2016 मध्ये चॅनेल बनवलं होतं. तेव्हापासून एल्विशला भलतीच पसंती मिळत गेली होती. त्याच्या युट्यूब चॅनेलला 45 लाखांपेक्षा अधिक सबस्क्राईबर आहेत. यासोबतच एल्विश यादव कपड्यांचे व्यापारीदेखील आहे.
Uttar Pradesh: Elvish Yadav appears before police in snake venom case
Read @ANI Story | https://t.co/NNqramVwfG#ElvishYadav #snakevenom #Noida pic.twitter.com/6E7JJdDVqQ
— ANI Digital (@ani_digital) November 8, 2023
याआधीही एल्विश अनेकदा चर्चेत..
एल्विश यादवने आशिका यादवसोबत व्हिडिओ बनवल्या प्रकरणी वादात अडकला होता. त्याच्यावर बॉडी शेमिंग, साईबर बुलिंगचा आरोप करण्यात आहे. या प्रकरणी आशिका यादवने एल्विशला कायदेशीर कारवाईबाबतची धमकी दिली होती.