Download App

कुराण अन् मांसाहाराचीही मागणी, तहव्वुर राणाच्या याचिकेवर एनआयएला न्यायालयाची नोटीस

Tahawwur Rana : भारताने मोठी कारवाई करत काही दिवसांपूर्वी 26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वुर राणा (Tahawwur Rana) याला

  • Written By: Last Updated:

Tahawwur Rana : भारताने मोठी कारवाई करत काही दिवसांपूर्वी 26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वुर राणा (Tahawwur Rana) याला अमरिकेतून (America) भारतात आणले आहे. तर आता त्याने त्याच्या कुटुंबियांशी बोलण्यासाठी पटियाला हाऊस (Patiala House) येथील एनआयएच्या विषेश न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. या याचिकेवर सुनावणी करताना न्यायाधीश चंद्रजीत सिंह यांनी एनआयएला नोटीस बजावली आहे. न्यायालयाने एनआयएला 23 एप्रिलपर्यंत उत्तर देण्यास सांगितले आहे.

तर दुसरीकडे दहशतवादी राणाने कुटुंबियांशी बोलण्याबरोबर कुराण आणि मांसाहारी जेवणाची मागणी केली आहे. असा दावा काही मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात येत आहे. या प्रकरणात पुढील सुनावणी 23 एप्रिल रोजी होणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार राणा कॅनडामध्ये राहणाऱ्या त्याच्या धाकट्या भावाशी बोलू इच्छितो. राणा हा मुंबई हल्ल्याचा मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप आहे. राणाच्या अटकेनंतर एनआयएने त्याला 10 एप्रिल रोजी पटियाला हाऊस कोर्टात हजर करत कोठडीची मागणी केली होती. यानंतर न्यायालयाने राणाला 18 दिवसांसाठी एनआयए कोठडीत पाठवले होते.

एनआयएने आरोप केला होता की गुन्हेगारी कटाचा एक भाग म्हणून, आरोपी डेव्हिड कोलमन हेडलीने भारतात येण्यापूर्वी राणासोबत संपूर्ण ऑपरेशनची चर्चा केली होती. रिमांडची मागणी करताना, एनआयएने न्यायालयाला सांगितले की संभाव्य आव्हानांचा अंदाज घेऊन, हेडलीने राणाला त्याच्या वस्तू आणि मालमत्तेची माहिती देणारा ईमेल पाठवला होता. एनआयएने आरोप केला आहे की हेडलीने राणाला या प्रकरणातील आरोपी इलियास काश्मिरी आणि अब्दुर रहमान या पाकिस्तानी नागरिकांच्या कटात सहभागाची माहिती दिली होती.

लाडकी बहीण योजना, एप्रिलचा हप्ता कधी मिळणार? आदिती तटकरेंनी दिली महत्वाची माहिती

26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्यात 166 जणांचा मृत्यू  

26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईवर दहा दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. ताजमहाल पॅलेस हॉटेल, ओबेरॉय ट्रायडंट, लिओपोल्ड कॅफे, छत्रपती शिवाजी टर्मिनल, ज्यू सेंटरसह अनेक ठिकाणांना टार्गेट करण्यात आले. या दहशतवादी हल्ल्यात 166 लोकांचा मृत्यू झाला होता. यामध्ये अमेरिकन, ब्रिटिश आणि इस्रायली नागरिकांचा समावेश होता, तर अनेक जण जखमी झाले होते.

follow us