Download App

धक्कादायक! ‘या’ घातक विषाणूमुळे शेकडो मांजरांचा मृत्यू; लक्षणं अन् उपाय काय?

कर्नाटकातील रायचूर जिल्ह्यात एफपीव्ही नावाचा विषाणू मांजरांमध्ये वेगाने फैलावत चालला आहे. यामुळे शेकडो मांजरांचा मृत्यू झाला आहे.

Karnataka News : कर्नाटक राज्यातून (Karnataka News) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. राज्यातील रायचूर जिल्ह्यात एफपीव्ही नावाचा विषाणू मांजरांमध्ये वेगाने फैलावत चालला आहे. यामुळे शेकडो मांजरांचा मृत्यू झाला आहे. या विषाणूने संक्रमित झालेल्या मांजराची जिवंत राहण्याची शक्यता फक्त 1 टक्का राहते. हा विषाणू अत्यंत वेगाने फैलावतो. सुदैवाची गोष्ट म्हणजे या विषाणूा माणसांना काहीच धोका नाही असे आरोग्य तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.

एफपीवी व्हायरस (Feline panleukopenia Virus) संपूर्ण राज्यातच पसरला आहे. मांजरांना अतिशय वेगाने संक्रमित करत आहे. रायचूर जिल्ह्यात नऊशे पेक्षा जास्त मांजरांत हा विषाणू आढळून आला आहे. जर एका गटात दहा मांजरी असतील तर त्यातील एक मांजर या व्हायरसने संक्रमित असेल तर अगदी काही सेकंदातच बाकीच्या मांजरी देखील संक्रमित होतील इतका वेग या व्हायरसचा आहे. या व्हायरसापासून मांजरांची विशेष काळजी घ्यावी अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

धडकी भरवणारी बातमी! चीनमध्ये नवा कोरोना व्हायरस, जनावरांतून माणसांत संसर्ग; जगात खळबळ

एडिनबर्ग अॅनिमल हॉस्पिटलच्या वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले की एफपीव्ही व्हायरसचा मानव आणि श्वानांना कोणताही धोका नाही. परंतु, हा व्हायरस माणसांचे कपडे, बूट किंवा हातांच्या संपर्काच्या माध्यमातून मांजरांत फैलावू शकतो. हा व्हायरस अत्यंत संसर्गजन्य असून त्याच्यावर सध्या तरी कोणतेच उपचार उपलब्ध नाहीत. या व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी कर्नाटक सरकारने तत्काळ उपाययोजना सुरू केल्या आहेत. पशुवैद्यकीय विभागाकडून मांजरांच्या लसीकरणावर भर दिला जात आहे. तसेच हा विषाणू नेमका काय आहे, मांजरांत कसा फैलावतो याची माहिती देण्यासाठी जनजागृती केली जात आहे.

विषाणूची लक्षणे काय, काळजी कशी घ्याल?

जर तुमच्याकडेही पाळीव मांजर असेल तर त्याला इतर मांजरांच्या संपर्कात येऊ देऊ नका. घरात स्वच्छता ठेवा. जर मांजरात काही लक्ष णे दिसून येत असतील तर तत्काळ पशुवैद्यकांचा सल्ला घ्या. मांजरांचे नियमित लसीकरण करून घ्या. या विषाणूची लागण झालेल्या मांजरात अशक्तपणा, भूक न लागणे, जुलाब आणि उच्च ताप अशी लक्षणे दिसतात.

कोरोना व्हायरस चिनी प्रयोगशाळेतूनच लीक, CIA ने केला मोठा दावा

follow us