चंद्राला हिंदू राष्ट्र आणि शिवशक्ती पॉइंटला राजधानी घोषित करा; स्वामी चक्रपाणी यांची मागणी

Chandrayaan-3 : भारताच्या चांद्रयान-3 (Chandrayaan-3) मोहिमेचे 23 ऑगस्टला चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर (Moon South Pole) सॉफ्ट लँडिंग करून इतिहास रचला. त्यानंतर देशभरात जल्लोषाचे वातावरण आहे. चांद्रयान-3 च्या लँडिंग साइटला ‘शिवशक्ती’ पॉइंट (‘Shiva Shakti’ point) असे संबोधले जाईल, अशी घोषणा पंतप्रधान मोदींनी (narendra modi) केली होती. या नामांतरानंतर देशातील राजकारणही तापले होते. आता हिंदू महासभेचे अध्यक्ष स्वामी […]

Swami Chakrapani

Swami Chakrapani

Chandrayaan-3 : भारताच्या चांद्रयान-3 (Chandrayaan-3) मोहिमेचे 23 ऑगस्टला चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर (Moon South Pole) सॉफ्ट लँडिंग करून इतिहास रचला. त्यानंतर देशभरात जल्लोषाचे वातावरण आहे. चांद्रयान-3 च्या लँडिंग साइटला ‘शिवशक्ती’ पॉइंट (‘Shiva Shakti’ point) असे संबोधले जाईल, अशी घोषणा पंतप्रधान मोदींनी (narendra modi) केली होती. या नामांतरानंतर देशातील राजकारणही तापले होते.

आता हिंदू महासभेचे अध्यक्ष स्वामी चक्रपाणी यांनीही याप्रकरणी वक्तव्य केले आहे. ते म्हणाले की, “जिहादी मानसिकतेचे लोक चंद्रावर पोहोचण्याआधीच चंद्राला हिंदू राष्ट्र घोषित करावे आणि शिवशक्ती पॉइंटला हिंदू राष्ट्राची राजधानी बनवायला हवी.”

Hasan Mushrif : शरद पवार अन् अजितदादा एकत्र येणार का? मुश्रीफांनी स्पष्टच सांगितलं

“चंद्राला हिंदू राष्ट्र घोषित करावे”
ते पुढे म्हणाले, “आम्ही शिवशक्ती पॉइंटकडे शिवशक्ती धाम म्हणून पाहत आहोत. हिंदू महासभा, संत महासभेच्या वतीने मी सरकारला चंद्राला हिंदू राष्ट्र म्हणून घोषित करून शिवशक्ती पॉइंटला त्याची राजधानी करण्याचे पत्रही पाठवत आहे.” तसेच आम्ही शिवशक्ती पॉइंट येथे भगवान शिव, माँ पार्वती आणि भगवान गणेशाचे भव्य मंदिर बांधू, असा प्रस्तावही मंजूर केला आहे.

पंतप्रधानांनी ही घोषणा केली
2019 मध्ये चंद्राच्या पृष्ठभागावर ज्या ठिकाणी चांद्रयान-2 ने आपल्या पावलांचे ठसे सोडले त्या ठिकाणाला तिरंगा पॉइंट असे म्हटले जाईल आणि 23 ऑगस्ट हा राष्ट्रीय अवकाश दिवस म्हणून साजरा केला जाईल, असेही पंतप्रधान मोदींनी शनिवारी सांगितले होते.

‘सरकार आपल्या दारी थापा मारतंय लय भारी’; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

इस्रोने 14 जुलै रोजी चांद्रयान-3 लाँच केले. 23 ऑगस्टच्या संध्याकाळी ते चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीरित्या मऊ-लँड केले. याआधी कोणीही चंद्राच्या भागापर्यंत पोहोचू शकले नव्हते. असे करणारा भारत हा पहिला देश ठरला आहे.

Exit mobile version