Download App

Deepfake Video : ‘डीपफेक व्हिडिओ हटवा नाहीतर’… केंद्र सरकारचा अल्टिमेटम!

Deepfake Video : मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर डीपफेक व्हिडिओ (Deepfake Video) व्हायरल होत आहे. या तंत्रज्ञानाचा फटका प्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandana) हिला बसला होता. तेव्हापासूनचा हा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आता केंद्र सरकारनेही या प्रकारांची गंभीर दखल घेत कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. सोशल मीडियावर जे कुणी असे डीपफेक व्हिडिओ अपलोड करत आहेत त्यांना सरकारने अल्टिमेटम दिला आहे. 36 तासांत फेसबुक, गुगल आणि यु ट्यूबवरून डीपफेक व्हिडिओ हटवा अन्यथा कारवाईला सामोरे जा, असा इशारा केंद्र सरकारने दिला आहे. केंद्र सरकारच्या या कारवाईने डीपफेक व्हिडिओ तयार करून अपलोड करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

नरेंद्र मोदींनाही डीपफेकचा फटका, युजर्संना दिला महत्त्वाचा सल्ला

काही दिवसांपासून सोशल मीडियावर डीपफेक व्हिडिओ व्हायरल होत आहे. याचा फटका खुद्द पीएम मोदी यांनाही बसला आहे. त्यामुळे केंद्र सरकार अलर्ट झाले आहे. केंद्रीय राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर म्हणाले, की फेसबुक, यु ट्यूब, गुगलने त्यांच्या फ्लॅटफॉर्मवरील सर्व डीपफेक व्हिडिओ हटवले नाहीत तर त्यांची कोणतीही सबब ऐकून घेतली जाणार नाही. या गंभीर मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी 24 नोव्हेंबर रोजी एक बैठक आयोजित करण्यात आली आहे. डीपफेक व्हिडिओंवर तत्काळ कारवाई करण्याच्या सूचना या बैठकीत दिल्या जातील, असे चंद्रशेखर म्हणाले.

देशातील कोट्यावधी इंटरनेट वापरकर्त्यांसाठी हा मोठा धोका आहे. त्यामुळे सरकारने याची गंभीर दखल घेतली आहे. ही बाब माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत येते आणि जर ऑनलाइन प्लॅटफॉर्म तसं करू शकत नसतील तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. त्यामुळे आता 36 तासांत हे सर्व डीपफेक व्हिडिओ हटवले गेले पाहिजेत अशी भूमिका केंद्र सरकारने घेतली आहे. केंद्र सरकारच्या या इशाऱ्यानंतर कंपन्या हे व्हिडिओ हटवतील का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Aishwarya Deepfake Video: रश्मिका अन् सारापाठोपाठ ऐश्वर्या राय डीप फेकच्या जाळ्यात!

पंतप्रधानांचा फेक व्हिडिओ व्हायरल झाला

गेल्या महिन्यात पीएम मोदींचा गरबा डान्सचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यामध्ये पंतप्रधानांसारखी दिसणारी व्यक्ती काही महिलांसोबत गरबा करताना दिसत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी नवरात्रीत गरबा खेळतानाचा हा व्हिडिओ असल्याचे बोलले जात आहे. या दाव्याचा हा व्हिडिओ फेसबुक आणि ट्विटरवर चांगलाच व्हायरल होत आहे.

 

Tags

follow us