Download App

मानहानी प्रकरणात राहुल गांधींचे सुप्रीम कोर्टात उत्तर; ‘मोदींनी माझे भाषण ऐकले नाही’

  • Written By: Last Updated:

Rahul Gandhi Defamation Case: मोदी आडनावाशी संबंधित मानहानी प्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी (4 ऑगस्ट) होणाऱ्या सुनावणीपूर्वी सर्वोच्च न्यायालयात उत्तर दाखल केले आहे. सत्र न्यायालयात अपील प्रलंबित असल्याचे त्यांनी बुधवारी (2 ऑगस्ट) सर्वोच्च न्यायालयात सांगितले. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने शिक्षेला स्थगिती द्यावी. पूर्णेश मोदींनी त्यांचे भाषण थेट ऐकले नाही. माझी केस अपवाद म्हणून दिलासा द्यावा, असे म्हटले आहे.

मानहानीच्या प्रकरणात जास्तीत जास्त शिक्षा झाल्यामुळे त्यांचे संसदेचे सदस्यत्व गमवावे लागल्याचे त्यांनी सांगितले. पूर्णेश मोदी हे मुळात मोदी समाजातील नाहीत. यापूर्वी त्यांना कोणत्याही प्रकरणात शिक्षा झालेली नाही. माफी न मागितल्याने त्यांना अहंकारी म्हणणे चुकीचे आहे, असेही त्यांनी म्हटलेले आहे.

पूर्णेश मोदींनी काय दावा केला?
मोदी आडनाव मानहानी प्रकरणी तक्रारदार पूर्णेश मोदी यांनी 31 जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयात उत्तर दाखल केले होते. यामध्ये त्यांनी राहुल गांधी यांची याचिका फेटाळण्याची मागणी केली आहे. दरम्यान राहुल गांधींनी त्यांच्या शिक्षेला स्थगिती देण्याची मागणी केली आहे आणि त्यावर 4 ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे.

राज्यात कोरोनाची रिएंट्री! रुग्णांची संख्या शंभरीकडे, मुंबई-पुण्यात सर्वांधिक रुग्ण

राहुल गांधींना दिलासा देण्याचा कोणताही आधार नसल्याचे पूर्णेश मोदी यांनी म्हटले आहे. त्याचे वागणे अहंकाराने भरलेले आहे. कोणत्याही कारणाशिवाय संपूर्ण वर्गाचा अपमान केल्यानंतर त्यांनी माफी मागण्यास नकार दिला, असे म्हटले आहे.

राहुल गांधी सर्वोच्च न्यायालयात का गेले?
मानहानीच्या एका खटल्यात, राहुल गांधींना या वर्षी मार्चमध्ये सुरत न्यायालयाने दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती आणि गुजरात उच्च न्यायालयाने 7 जुलै रोजी त्यांच्या शिक्षेला स्थगिती देण्यास नकार दिला होता. यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. कोर्टाने 21 जुलै रोजी गुजरात सरकारसह संबंधित पक्षांना नोटीस बजावून उत्तर दाखल करण्यास सांगितले.

Tags

follow us