Rajnath Singh : एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची तब्येत अचानक बिघडल्याने बुधवारी (11जुलै) रात्री उशिरा त्यांना एम्समध्ये (AIIMS) दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांना एम्सच्या खासगी वॉर्डात दाखल करण्यात आले आहे. न्यूरो सर्जन डॉ.अमोल रहेजा यांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. राजनाथ सिंह यांना पाठदुखीचा त्रास होत असल्याने त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार पहाटे 3 वाजता पाठदुखीचा त्रास होत असल्याने त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले आहे.
Defence Minister Rajnath Singh was admitted to the old private ward, early morning today, with a complaint of back pain. He is stable and under observation: AIIMS Delhi
(File photo) pic.twitter.com/WTsHj1vt2H
— ANI (@ANI) July 11, 2024
राजनाथ सिंह यांनी 10 जुलै रोजी त्यांचा 73 वा वाढदिवस साजरा केला आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक नेत्यांनी त्यांना ट्विटरवरून शुभेच्छा दिल्या होत्या तर अनेक नेत्यांनी त्यांच्या त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
अग्निविरांसाठी आनंदाची बातमी! CISF-BSF मध्ये मिळणार आरक्षण, जाणून घ्या सर्वकाही
एम्सकडून निवेदन जारी
एम्सकडून एक निवेदन जारी करण्यात आले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना पाठदुखी त्रास होत असल्याने त्यांना आज पहाटे खाजगी वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले.
सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहे. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. त्याला लवकरच डिस्चार्ज मिळू शकतो. अशी माहिती एम्सकडून देण्यात आली आहे.