अग्निविरांसाठी आनंदाची बातमी! CISF-BSF मध्ये मिळणार आरक्षण, जाणून घ्या सर्वकाही

अग्निविरांसाठी आनंदाची बातमी! CISF-BSF मध्ये मिळणार आरक्षण, जाणून घ्या सर्वकाही

Agniveer Reservations : केंद्र सरकारने (Central Government) निर्णय घेत अग्निविरांसाठी (Agniveer) मोठी घोषणा केली आहे. सरकारने आता अग्निविरांना CISF आणि BSF मध्ये 10 टक्के जागा राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सीआयएसएफ आणि बीएसएफच्या प्रमुखांनी याबाबत माहिती दिली आहे.

केंद्रीय गृह मंत्रालयाच्या निर्णयानुसार आता CISF आणि BSF मध्ये अग्निविरांसाठी 10 टक्के राखावी ठेवण्यात येणार आहे. अशी माहिती सीआयएसएफच्या महासंचालक नीना सिंह यांनी दिली.

याबाबत माहिती देताना सीआयएसएफच्या महासंचालक नीना सिंह म्हणाले की, आता CISF आणि BSF मध्ये कॉन्स्टेबलच्या सर्व नियुक्त्यांमध्ये 10 टक्के नोकऱ्या अग्निविरांना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याच बरोबर त्यांना शारीरिक चाचण्यांमध्येही वयात सवलत देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

बीएसएफमध्येही आरक्षणाची घोषणा

सीमा सुरक्षा दलाचे महासंचालक नितीन अग्रवाल म्हणाले, अग्निविरांना चार वर्षांचा अनुभव असतो त्यामुळे ते पूर्णपणे प्रशिक्षित असतात आणि ही गोष्ट बीएसएफसाठी खूप फायदेशीर ठरणार आहे. केवळ बीएसएफला नाहीतर इतर  सुरक्षा दलांना देखील या निर्णयाचा फायदा होणार आहे. असं सीमा सुरक्षा दलाचे महासंचालक नितीन अग्रवाल म्हणाले.

केंद्र सरकारने जून 2022 मध्ये अग्निपथ भरती योजना सुरू केली होती. सुरुवातीला या योजनेचा मोठा विरोध झाला होता. या योजनेत 17 ते 21 वर्षे वयोगटातील तरुणांना चार वर्षांसाठी भारतीय सैन्यात भरती केले जाते आणि त्यानंतर 25 टक्के सैनिकांना 15 वर्षे सेवेत कायम ठेवण्यात येते.  या योजनेवरून केंद्र सरकारवर विरोधकांनी जोरदार टीका केली होती. चार वर्षांचा कार्यकाळ संपल्यानंतर 75 टक्के अग्निवीरांचे काय होईल? असा सवाल देखील  त्यांनी उपस्थित केला होते.

Babar Azam चं काय होणार ?, पीसीबी ‘त्या’ प्रकरणात घेणार निर्णय

अग्निवीरला दरमहा 30,000ते 40, 000रुपये पगार देण्यात येतो. याच बरोबर इतर भत्ते देखील त्यांना मिळतात.  चार वर्षे पूर्ण झाल्यावर अग्निविरांना  अंदाजे 11.71 लाख रुपये (व्याजासह) मिळतात आणि त्यावर आयकरातून सूट दिली जाते.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube