मधमाश्या करणार सीमांचे रक्षण : BSF ची अनोखी शक्कल; स्थानिकांनाही मिळणार रोजगार

मधमाश्या करणार सीमांचे रक्षण : BSF ची अनोखी शक्कल; स्थानिकांनाही मिळणार रोजगार

नवी दिल्ली : सीमा सुरक्षा दल अर्थात बीएसएफकडून भारत (India) आणि बांगलादेश (Bangladesh) सीमेच्या भिंतींवर आता मधमाश्या पाळण्याचा उपक्रम राबविण्यात येणार आहेत. यामुळे जनावरांच्या तस्करीसाठी कुंपणावरील झुडपे कापणे तसेच इतर गुन्ह्यांना आळा बसणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे या माध्यमातून स्थानिकांना रोजगार मिळण्यासही मदत होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. पश्चिम बंगालमधील नादिया जिल्ह्यात बीएसएफच्या 32 व्या तुकडीकडून या अनोख्या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, भारत-बांगलादेश या दोन्ही देशांमधील सीमा बंदिस्त आहे. मात्र त्यानंतरही अनेक छुप्या मार्गांनी अवैध घुसखोरी होत असते. शिवाय जनावरांच्या तस्करीसाठी कुंपणावरील झुडपांची कापणी केली जाते. यावरच उपाय म्हणून सीमेची सुरक्षा करण्यासाठी आणि स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देणे, यासाठी मधमाश्या पालनाचा हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे एका अधिकाऱ्यांने सांगितले. (Beekeeping activities will now be implemented by BSF on the India-Bangladesh border walls)

काटेवाडीत अजित पवारच ‘दादा’; शिंदे गटाकडून वळसे-पाटलांच्या 40 वर्षांच्या सत्तेला सुरुंग

याबाबत बोलताना बीएसएफच्या 32 व्या तुकडीचे कमांडंट सुजीतकुमार म्हणाले, केंद्र सरकारच्या ‘व्हायब्रंट व्हिलेज प्रोग्राम’ या अभियानांतर्गत बीएसएफकडून हा उपक्रम राबवला जात आहे. बीएसएफने आयुष मंत्रालयाला वनौषधी पुरविण्याची विनंती केली आहे. मधमाश्यांच्या पेटीभोवती मुबलक प्रमाणात वनौषधींची लागवड केल्यास मधमाश्यांनाही परागीकरण करण्यास मोठी मदत होईल. मधुमक्षिकापालन करणाऱ्या शेतकऱ्यांना यासाठीच्या पेट्या सुकरपणे मिळतील, याची काळजी बीएसएफकडून घेण्यात येईल, असेही आश्वासन त्यांनी दिले.

आता एवढी दहशत माजवायची अन्… : थेट जरांगेंच्या गावातूनच भुजबळांचा कुणबी प्रमाणपत्राला विरोध

आयुष मंत्रालय पुरविणार मधमाश्या :

या उपक्रमासाठी आयुष मंत्रालयालाचाही सहभाग असणार आहे. आयुष मंत्रालयाकडूनच यासाठी मधमाश्यांचा पुरवठा करण्यात येणार आहे. शिवाय सीमेवरील कुंपणावर त्यांना बसवण्यासाठी आवश्यक असणारी कौशल्ये ‘बीएसएफ’ला शिकवली जाणार आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube