समीर वानखेडेंना बांगलादेशमधून जीवे मारण्याची धमकी, मुंबई पोलिसांत तक्रार दाखल

  • Written By: Published:
समीर वानखेडेंना बांगलादेशमधून जीवे मारण्याची धमकी, मुंबई पोलिसांत तक्रार दाखल

Sameer Wankhede Death Threat : आर्यन खान प्रकरणामुळं चर्चेत आलेले एनसीबी मुंबईचे माजी झोनल अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्या मागे लागलेला दृष्टचक्राचा फेरा कायम आहे. वानखेडे यांना जीवे मारण्याच्या धमक्या सुरूच आहेत. आताही वानखेडेंना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. याप्रकरणी त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. ड्युटीवर असताना सोशल मीडियावर धमकीचा (threat) मेसेज आल्याचा दावा त्यांनी केला. बांगलादेशातून आपल्याला धमकीचा मेसेज आला, असं त्यांनी तक्रारीत सांगितलं.

Ram Kadam new look : नवीन हेअरस्टाईलमुळे आमदार कदम चर्चेत | LetsUpp Marathi 

काही दिवसांपूर्वी समीर वानखेडेंनी एका कार्यक्रमात बोलतांना सांगितले होते की, मी अंडरवर्ल्डला घाबरत नाही. देशाबाहेरून कोणी मला धमकावत असेल तर मी त्याला घाबरत नाही, त्यांच्यात धमक असेल तर त्यांनी माझ्यासमोर यावं आणि चर्चा करावी. अंडरवर्ल्डचे गुन्हेगार हे आमच्यासाठी फार छोटे गुन्हेगार आहेत, असं ते म्हणाले होते. यानंतर काहीच दिवसांत वानखेडेंना जीवे मारण्याची धमकी आलीय. बुधवारी हा सगळा प्रकार उघडकीस आला. ही बाब मुंबई पोलिस आयुक्तांना कळवण्यात आली, त्यांनी हे प्रकरण तपासासाठी गोरेगाव पोलिसांकडे सोपवले आहे.

याबाबत माध्यमांशी बोलत असताना वानखेडे म्हणाले की, आपल्या फोनवर धमकीचा मेसेज आला. आर्यन खान आणि त्याचे वडील शाहरुख खान यांच्या प्रकरणातील सहभागाबाबत सांगत, अज्ञात व्यक्तीने जीवे मारण्याची धमकी दिली, असं वानखेडे यांनी सांगितलं. मुस्लिम नागरिक आणि त्यांच्या भावना दुखावल्याचा आऱोप करत (त्यांच्या) गटाकडून मारण्यात येईल, असा दावा मेसेजमध्ये करण्यात आला.

सध्या समीर वानखेडे हे चेन्नई येथे ड्युटीवर आहेत. त्यांना हा धमकीचा मेसेज बांगलादेशच्या राजाशाही शहरातून आल्याचा खुलासा त्यांनी केला. हा मेसेज आल्यानंतर त्यांनी नंबर ट्रेस केला असता हा नंबर बांगलादेशात असल्याचं स्पष्ट झालं.

आर्यन खानच्या केसेमध्ये वानखेडे वादात का सापडले?

कॉर्डेलिया क्रूझवर 2021 मध्ये नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने छापा टाकला होता. त्या क्रूझवर ड्रग पार्टी झाल्याचा दावा एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी केला होता. या छाप्यात अनेकांना अटक करण्यात आली. त्यात शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचाही समावेश होता. तेव्हा समीर वानखेडे हे मुंबई एनसीबीचे तत्कालीन विभागीय संचालक होते. या प्रकरणी आर्यन खान जवळपास महिनाभर तुरुंगात होता. नंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली.मात्र काही काळानंतर वानखेडेंवर खंडणी मागितल्याचा आरोप करण्यात आला. आर्यनच्या सुटकेसाठी त्यांनी आर्यनच्या कुटुंबीयांकडून 25 कोटी रुपयांची लाच मागितल्याचा आरोप होता.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube