Kangana Ranaut ला कानशिलात लगावणं पडलं महागात; CISF महिला कॉन्स्टेबलला ठोकल्या बेड्या

Kangana Ranaut ला कानशिलात लगावणं पडलं महागात; CISF महिला कॉन्स्टेबलला ठोकल्या बेड्या

Kangana Ranaut Slapped CISF Constable Arrested : बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री कंगना रणौतच्या (Kangana Ranaut) कानशिलात लगावणे सीआयएसएफच्या (CISF) महिला कॉन्स्टेबलला चांगलंच महागात पडलं आहे. सुरूवातीला निलंबनाची कारवाई झाल्यानंतर आता या महिला कॉन्स्टेबलला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. कंगनाला कानशिलात मारणाऱ्या महिला कॉन्स्टेबलचे नाव कुलविंदर कौर असल्याचे सांगण्यात येत आहे. कंगनाला कानशिलात मारल्यानंतरही ती चांगलीच संतापलेली दिसली होती.

राज्याच्या राजकारणात पुन्हा ट्विस्ट; तुर्तास राजीनामा देऊ नका; शाहंच्या फडणवीसांना सूचना

चंदीगड विमानतळावर नेमकं काय घडलं?

चंदीगड विमानतळावर सीआयएसएफ महिला गार्डने कंगना रणौतच्या कानशिलात लगावली होती. कानशिलात मारणाऱ्या गार्डचे नाव कुलविंदर कौर असल्याचे सांगण्यात येत आहे. कंगना राणौत शेतकऱ्यांच्या आंदोलनाविरोधात बोलल्यानं CISF गार्ड रागावली होती. असं देखील तिने सांगितलं. दिल्लीत पोहोचल्यानंतर कंगनाने सीआयएसएफच्या महासंचालक नीना सिंह आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि त्यांना या प्रकरणाची माहिती दिली. त्यानंतर कॉन्स्टेबल कुलविंदरला ताब्यात घेऊन चौकशीसाठी CISF कमांडंट कार्यालयात नेण्यात आले.

नाशिकमध्ये राडा! आमदार किशोर दराडेंकडून अपक्ष उमेदवार दराडेंना मारहाण

CISF महिला कॉन्स्टेबलने सांगितले सत्य…

दरम्यान महिला कॉन्स्टेबलने कंगना राणौतला कानशिलात का मारली, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. कंगनाला कानशिलात मारल्यानंतर स्वतःच महिला कॉन्स्टेबलनेच संपूर्ण सत्य सांगितले आहे. की, “शेतकऱ्यांच्या आंदोलनात तिने हे वक्तव्य केले होते आणि 100-100 रुपये घेऊन बसत नाही.” ती तिथे बसली होती का? तेव्हा माझी आई शेतकऱ्यांच्या आंदोलनात बसली होती.

कानशिलात मारण्याच्या घटनेनंतर कंगना काय म्हणाली?

कानशिलात मारण्याच्या घटनेनंतर कंगना राणौतचे वक्तव्यही समोर आले आहे. अभिनेत्रीने तिच्या इन्स्टा स्टोरीमध्ये एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. यामध्ये ती म्हणतेय की, मला माझ्या शुभचिंतकांचे खूप फोन येत आहेत. सर्वप्रथम मी तुम्हाला सांगते की मी सुरक्षित आहे. चंदिगड विमानतळावर आज सुरक्षा तपासणीदरम्यान हा हल्ला झाला. सिक्युरिटी चेक करून मी बाहेर येताच दुसऱ्या केबिनमधील महिला माझी वाट पाहत थांबली आणि बाजूने येऊन माझ्या कानशि‍लात लगावली आणि शिवीगाळ करू लागली.

कंगनाने व्हिडिओमध्ये पुढे म्हटले आहे की, “ज्या महिलेने मला कानशिलात मारली ती सीआयएसएफ गार्ड आहे. मी तिला असे का केले असे विचारले असता तिने शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा असल्याचे सांगितले. पण माझी चिंता ही आहे की पंजाबमध्ये वाढत असलेला दहशतवाद आणि अतिरेकी आपण कसे हाताळणार?

follow us
  • fb
  • instagram
  • youtube