राज्याच्या राजकारणात पुन्हा ट्विस्ट; तुर्तास राजीनामा देऊ नका; शाहंच्या फडणवीसांना सूचना

  • Written By: Published:
राज्याच्या राजकारणात पुन्हा ट्विस्ट; तुर्तास राजीनामा देऊ नका; शाहंच्या फडणवीसांना सूचना

नवी दिल्ली : राज्यातील महायुतीच्या लोकसभेतील पराभवाची जबाबदारी स्वीकारत फडणवीसांनी वरिष्ठांनी मला सरकारमधून दूर करावे, अशी विनंती करणार असल्याचे विधान केले होते. त्यांच्या या विधानानंतर राज्यातील राजकारणात अनेक चर्चांना पेव फुटले होते. त्यानंतर आज (दि.7) अमित शाहंसोबत (Amit Shah) फडणवीसांची बैठक पार पडली यात शाहंनी तुर्तास राजीनामा देऊ नका अशा सूचना देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadnavis) दिल्याचे सांगितले जात आहे. (Amit Shah Reject Devendra Fadnavis Resignation Request )

Video : मोदींना स्टॅडिंग ओव्हेशन देताना गडकरी खरचं उभे राहिले नाही का?; नेमकं सत्य काय…

काय म्हणाले शाह?

“तुम्ही राजीनामा दिला तर भाजप कार्यकर्त्यांच्या मनोबलावर परिणाम होईल. त्यामुळेच आत्ताच राजीनामा नको. शपथविधी नंतर राजीनामा संदर्भात सविस्तर चर्चा करू.” अशा शब्दांत अमित शाहांनी फडणवीसांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्रात करेक्टीव्ह उपाय योजना केल्या पाहीजेत. राज्यात भाजपसाठी काय काय करता येईल यावर आराखडा तयार करा आणि काम सुरू ठेवा असं अमित शाहांनी फडणवीसांना सांगितले आहे.

Video : चार वेळा वदवून सांगितलं सोबत राहू; ‘पलटू पंटर’ नितीश कुमारांनी गाजवली NDA ची बैठक

सध्या तुम्ही तुमचे काम सुरु ठेवा. नरेंद्र मोदी यांचा शपथविधी झाल्यानंतर आपण महाराष्ट्राबाबत सविस्तर चर्चा करुन निर्णय करु. महाराष्ट्रात काय करेक्टिव्ह उपाययोजना केल्या पाहिजेत, याचा आराखडा तयार करू. पण, तोवर तुम्ही आपले काम सुरू ठेवा, असा सल्लाच अमित शाह यांनी फडणवीसांना दिला.

काय म्हणाले होते फडणवीस?

लोकसभा निवडणुकीत आम्हाला अपेक्षित यश मिळालेलं नाही. या पराभवाची जबाबदारी मी स्वीकारतो.  तसंच, मला आता सकारमधून मोकळ करा अशी विनंती मी भाजपच्या पक्ष नेतृत्वाकडे करणार आहे अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभा निकालाच्या दुसऱ्या दिवशी (दि.5) पत्रकार परिषदते बोलताना दिली होती. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला मोठा झटका बसला. त्यातही भाजपाची मोठी पिछेहाट झाली.

भव्य राम मंदिरानंतरही भाजपने अयोध्या का गमावली? वाचा ग्राऊंड रिअॅलिटी

मागील निवडणुकीत एकट्या भाजपने 23 जागा जिंकल्या होत्या. यावेळी ही संख्या नऊपर्यंत कमी झाली. हा मोठा नामुष्कीजनक पराभव भाजपला सहन करावा लागला. शेतकऱ्यांचा रोष, मनमानी कारभार, दुसऱ्या पक्षांत फोडोफोडी या गोष्टी मतदारांना पटल्या नाहीत अशी चर्चा आता सुरू आहे. भाजपकडूनही निवडणुकीतील पराभवाच्या कारणांचा शोध घेतला जात आहे. काल या पराभवावर चर्चा करण्यासाठी आणि आगामी काळातील वाटचाल ठरवण्यासाठी चर्चा करण्यात आली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज