Download App

Delhi Assembly Elections 2025: मोठी बातमी! अरविंद केजरीवालांच्या गाडीवर दगडफेक

Delhi Assembly Elections 2025: संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान दिल्लीचे माजी मुख्यमंत्री

  • Written By: Last Updated:

Delhi Assembly Elections 2025: संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या (Delhi Assembly Elections 2025) प्रचारादरम्यान दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या व्हायरल व्हिडिओमध्ये मुख्यमंत्र्यांचा ताफा रस्त्यावरून जाताना दिसत आहे. त्याचवेळी रस्त्यावरील काही लोकांनी त्यांना काळे झेंडे दाखवले आणि घोषणाबाजी केली. पोलिसांनी त्या लोकांना रस्त्यावरून हटवले आणि मुख्यमंत्र्यांची काळी गाडी पुढे जात असतानाच मागून एक मोठा दगड त्यावर पडला.

तर आप कार्यकर्त्यांनी नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार प्रवेश वर्मा (Pravesh Verma) यांच्या समर्थकांवर हल्ला करण्याचा आरोप केला आहे. कार्यकर्त्यांचा आरोप आहे की भाजप पराभव होत असल्याने च केजरीवालांवर हल्ले करत आहे. तर दुसरीकडे या संपूर्ण प्रकरणात भाजप उमेदवार प्रवेश वर्मा यांनी एक व्हिडिओ पोस्ट करून आम आदमी पार्टीला प्रत्युत्तर दिले आहे.

मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीने भाजप कार्यकर्त्यांना चिरडले ज्यामूळे दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना लेडी हार्डिंग रुग्णालयात नेण्यात आल्याचा दावा भाजप उमेदवार प्रवेश वर्मा यांनी केला आहे.

follow us