Download App

Delhi Assembly elections : अजित पवार गटावर मोठी नामुष्की, २३ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त…

दिल्ली विधानसभा निवडणुकीत अजित पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. अजित पवार (Ajit Pawar) गटाच्या सर्व २३ उमेदवारांचा दारुण पराभव झाला.

  • Written By: Last Updated:

Delhi Assembly elections : दिल्ली विधानसभा निवडणुकीत (Delhi Assembly elections) भाजपने ४७ जागांवर मुसडी मारली आहे. तर आम आदमी पक्षाने 23 जागा जिंकल्या आहेत. तर अजित पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. अजित पवार (Ajit Pawar) गटाच्या सर्व २३ उमेदवारांचा दारुण पराभव झाला. या उमेदवारांना इतकी कमी मते मिळाली आहेत की निवडणूक आयोगाने त्यांची अनामत रक्कमही जप्त केली आहे.

Delhi Election Results : मोठी बातमी! दिल्लीत ‘आप’ ला मोठा दिलासा , मुख्यमंत्री आतिशी विजयी 

दिल्ली विधानसभा निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांना हॅटट्रीक काही करता आली नाही. भाजपाने जोरदार मुसंडी मारत दिल्लीची सत्ता आम आदमी पक्षाच्या हातातून अक्षरशः हिसकावून घेतली आहे. या विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांनी २३ उमेदवार उभे केले होते. ते सर्व उमेदवार पराभूत झाले आहेत आणि या उमेदवारांचे डिपॉझिटही जप्त झाले आहे. दिल्लीत अजित पवार गटाला फक्त ०.०३ टक्के मते मिळाली.

भाजपाच्या लाटेत दिग्गज भुईसपाट! केजरीवाल, सिसोदियांचा पराभव; ‘आप’ला मोठा धक्का 

दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजप सध्या सर्वाधिक जागांवर आघाडीवर आहे. आतापर्यंतच्या निकालांनुसार, भाजपने ४७ जागांवर मुसडी मारली आहे. तर आम आदमी पक्षाने 23 जागा जिंकल्या आहेत. याशिवाय, काँग्रेसला एकही जागा जिंकता आली नसून दिल्लीच्या जनतेने काँग्रेसला पूर्णपणे नाकारल्याचे दिसून येत आहे. त्यामुळं दिल्लीत भाजपची एकहाती सत्ता येणार हे निश्चित झालं.

अरविंद केजरीवाल पराभूत, वर्मांचा मोठा विजय
आम आदमी पक्षाचे दिग्गज नेतेही या निवडणुकीत पराभूत झाले आहेत. यामध्ये आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल, मनिष सिसोदिया यांचा पराभव झाला आहे. अरविंद केजरीवाल यांच्या विरुद्ध भारतीय जनता पार्टीने माजी खासदार प्रवेश वर्मा यांना तिकीट दिले होते. या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. दोन्ही उमेदवारांत अटीतटीची लढत झाली. सुरुवातीच्या मतमोजणीत केजरीवाल पिछाडीवर होते. नंतर मात्र त्यांनी आघाडी घेतली होती. परंतु, काही फेऱ्यांनंतर केजरीवाल केजरीवाल यांचा ६०० मतांनी पराभव झाला.

म्हणून आपचा पराभव – अण्णा हजारे
दिल्लीत ‘आप’च्या पराभवानंतर, सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मी अरविंद केजरीवाल यांना सांगितलं होतं. पण त्यांनी दारूवर लक्ष केंद्रीत केलं. त्यांच्या डोक्यात पैशाची, सत्तेची हवा गेली, त्यामुळं त्यांचा पराभव झाला, असं अण्णा हजारे म्हणाले.

follow us