Download App

दिल्लीचा मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स कायम, ‘या’ दिवशी होणार शपथविधी

नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघात अरविंद केजरीवाल यांचा पराभव करून निवडून आलेले परवेश वर्मा मुख्यमंत्रिपदासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहेत. 

Delhi Chief Minister : दिल्लीचा मुख्यमंत्री कोण असेल, कुणाला मुख्यमंत्रिपदाची खुर्ची मिळेल याचं उत्तर अजून मिळालेलं नाही. दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल (Delhi Election Results 2025) येऊन एक आठवडा उलटून गेला आहे. तरी देखील मुख्यमंत्रिपदाचा सस्पेन्स मिटलेला नाही. तब्बल 27 वर्षांनंतर भाजपने दिल्लीच्या सत्तेत वापसी केली (Delhi Elections) आहे पण अजून त्यांना मुख्यमंत्री ठरवता आलेला नाही. पण असं काय झालं की भाजपला अजूनही CM पदासाठी चेहरा मिळालेला नाही. याबाबत जाणून घेऊ या..

मुख्यमंत्री पदासाठी भाजपने एक खास फॉर्म्युला तयार केल्याची माहिती मिळाली आहे. निवडून आलेल्या 48 आमदरांतून 15 नावांची छाननी करण्यात आली आहे. नंतर जाती समीकरणाच्या आधारे 9 नावे निश्चित करण्यात आली. याच 9 मध्ये मुख्यमंत्री, विधानसभा अध्यक्ष आणि मंत्र्यांची नावे निश्चित केली जाणार आहेत. म्हणजेच निवडून आलेल्या उमेदवारांतूनच मुख्यमंत्री होईल इतके निश्चित आहे. नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघात अरविंद केजरीवाल यांचा पराभव करून निवडून आलेले परवेश वर्मा मुख्यमंत्रिपदासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहेत.

ठाकरेंना धक्क्यांवर धक्के! दिल्लीतील संमेलनात खासदाराची हजेरी; साळवीनंतर शिंदेंचं दुसरं ऑपरेशन

पीएम मोदी परदेश (PM Narendra Modi) दौऱ्यावरून परत आल्यानंतर लगेच दिल्लीत सरकार स्थापनेच्या हालचाली वेगाने सुरू होणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा आणि अन्य वरिष्ठ नेत्यांची मोदीबरोबर बैठक होणार आहे. या बैठकीत मुख्यमंत्री कोण होणार याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. यासाठी पक्षाच्या नेतृत्वाने आपला होमवर्क पूर्ण केला आहे. याच आधारावर पंतप्रधान मोदी यांच्याबरोबर चर्चा होणार आहे.

20 फेब्रुवारीला शपथविधी

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार येत्या 17 किंवा 18 तारखेला विधायक मंडळाची बैठक होऊ शकते. यानंतर 19 किंवा 20 फेब्रुवारी रोजी शपथविधी सोहळा आयोजित केला जाऊ शकतो. म्हणजेच दिल्लीत पुढील आठवड्यात सरकार स्थापन होऊ शकते. म्हणजेच दिल्लीत नवीन सरकार येण्यास अजून एक आठवडा वाट पहावी लागणार आहे. राज्यात निवडून आल्यानंतर सरकार स्थापन करण्यात भाजपकडून वेळ घेतला जात असल्याचे दिसत आहे.

दिल्लीत मुख्यमंत्री शपथविधी कधी होणार? भाजपाच्या नेत्यांचं खास प्लॅनिंग..

याआधी निवडणुकीचे निकाल आल्यानंतर शनिवारी सायंकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, जेपी नड्डा, अमित शाह यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली होती. याही बैठकीत दिल्लीतील संभाव्य सरकार आणि मुख्यमंत्री कोण असेल यावर चर्चा झाली. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार (Election Commission of India) दिल्लीत भाजपला 45.56 टक्के आणि आम आदमी पक्षाला 43.57 टक्के मते मिळाली. भाजपने 48 जागा जिंकून भाजपने विजयी आघाडी घेतली. आम आदमी पक्षाला मात्र 22 जागा मिळाल्या.

follow us